छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद!

    13-May-2024
Total Views | 112

EVM Machine 
 
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरु आहे. सोमवारी सकाळी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतू, छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले होते.
 
सकाळी ७ वाजतापासून चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले. मात्र, मतदानप्रक्रिया सुरु होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. याठिकाणी तब्बल २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे मतदारांची गैरसोय होऊन त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यानंतर लगेच २५ नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या. त्यामुळे आता सुरळीत मतदान सुरु आहे.
 
हे वाचलंत का? -  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! प्रवाशांची गैरसोय
 
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, याठिकाणी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

"काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

(PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121