‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार! उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

    11-May-2024
Total Views | 40
 
Devendra Fadanvis
 
पुणे : ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार असून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरी येथील गावजत्रा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "एनडीमध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या वारंवार बैठका!"
 
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात रेड झोनबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष वेधले. "फडणवीसांच्या सहकार्यामुळे शहरातील शास्तीकर, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, समाविष्ट गावांचा विकास, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प आदी ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील सर्व महत्वपूर्ण विषय मार्गी लागले. मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची ‘रेड झोन’च्या प्रश्नातून मुक्तता करावी," असे आवाहन यावेळी लांडगे यांनी केले.
 
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, "पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २ लाख मिळकतधारक, लघु व मध्यम उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी ‘रेड झोन’ हद्द कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार महेश लांडगे यांनी ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे. ‘रेड झोन’चा तिढा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी संरक्षण विभाग आणि मोदी सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेणार आहेत," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121