डॉ. महेंद्र कल्याणकर झोपुप्राचे नवे सीईओ

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पदोन्नती

    01-May-2024
Total Views | 183

mahendra kalyankr

मुंबई, दि.१ : प्रतिनिधी 
महाराष्ट्र सरकारने डॉ. महेंद्र कल्याणकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबईचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ.कल्याणकर हे कोकण विभागीय आयुक्त होते. ते २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सतीश लोखंडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाल्याने आयएएस डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळावर दि.३० एप्रिल रोजी डॉ. कल्याणकर यांनी सतीश लोखंडे यांच्याकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई सीईओ पदाचा पदभार स्वीकारला.


डॉ. कल्याणकर यांनी ठाणे, रायगड, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अकोला महानगरपालिकेचे आयुक्त या नात्याने त्यांना शासकीय योजनांची अंमलबजावणी विशेषत: 'ग्रीन अकोला' आणि 'अतिक्रमण हटाव मोहिमे'तील प्रशासकीय कौशल्यासाठी दोनदा 'उत्कृष्ट जिल्हाधिकारी' पुरस्कार मिळाला. राज्यातील खाजगी विकासकांचे ५००हून अधिक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत आणि संशयास्पद पुनर्विकास योजनांमध्ये बेदखल केलेल्या लाखो रहिवाशांना अनेक वर्षांपासून भाडे देखील दिले गेले नाही. त्यामुळे डॉ. कल्याणकर या प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यक्षम प्रशासक म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळात कोविड साथीच्या लॉकडाऊन दरम्यान रायगड जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ घेतल्यानंतर जानेवारी २०२३मध्ये त्यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.ते राज्याचे कामगार आयुक्त देखील होते आणि मुंबईतील असंघटित कामगार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय त्यांना जाते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121