मुंबई: जीएसटी प्रणाली २०१७ मध्ये लागू केल्यानंतर प्रथमच जीएसटी संकलनात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. प्रथमच सरकारने संग्रहणात केलेल्या जीएसटीत २.१० लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ एप्रिल महिन्यातील असून मार्चमध्ये जीएसटी(Goods and Sales Tax) १.७८ लाख कोटी होता. इयर ऑन इयर बेसिसवर जीएसटीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.घरगुती व्यवहारात झालेली वाढ आणि आयातीत केलेले व्यवहार यामुळे मुख्यतः ही वाढ झाली आहे.
मार्चमध्ये साधारणतः प्रत्येक कार्यालयात राहिलेला स्टॉक कमी केला जातो अथवा सेवा पुरवल्या जातात.आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च ओळखला जातो.त्यामुळे वस्तू सेवांच्या वाढलेल्या व्यापारातील वाढीमुळे ही वाढ झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २.१० लाख कोटींपर्यंत वाढलेले उत्पन्न हे इयर ऑन इयर बेसिसवर १२ टक्क्यांनी वाढले आहे. वाढलेल्या देशांतर्गत व्यवहारामुळे (१३.४ टक्के) व आयातीतील झालेल्या वाढीमुळे (८.३ टक्के) यामुळे मूलतः ही वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. आकडेवारीप्रमाणे निव्वळ जीएसटी संग्रहात एप्रिल २०२४ पर्यंत १.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ १७.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.