
मुंबई: आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ येणार आहे. ब्लॅकस्टोन या खाजगी इक्विटी कंपनीने पाठिंबा दिलेल्या आधार हाऊंसिंगचा आयपीओ (IPO) ८ मे पासून गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे.या आयपीओचा कालावधी ८ ते १० मे पर्यंत असणार आहे. गुंतवणूकीपूर्वी ७ मे रोजी अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांना हा आयपीओ गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
कंपनीने म्हटल्याप्रमाणे, १००० कोटींच्या इक्विटी समभागांचा हा फ्रेश इश्यू असणार आहे.या आयपीओत ऑफर फॉर सेल
(OFS) हा २००० कोटींचा असणार आहे हा सेल ब्लॅकस्टोन कंपनीशी संलग्न असलेल्या बीसीपी टॉपको या प्रमोटर (संस्थापक) कंपनीकडून असणार आहे. सध्या ही कंपनी आधार हाऊंसिंग फायनान्स कंपनीत ९८.७२ टक्के भागभांडवल राखून आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेचे कंपनीत १.१८ टक्के भागभांडवल आहे.
कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, आयपीओतून उभ्या केलेल्या ७५० कोटींचा निधीचा वापर भविष्यातील भाऔडवली गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे.मागील महिन्यात सेबीने या आयपीओसाठी कंपनीला परवानगी दिली होती.आधार हाऊसिंग फायनान्स ही विविध प्रकारचे कर्ज पुरवठा ग्राहकांना करते. विशेषतः कनिष्ठ मध्यमवर्गीय अथवा कमी उत्पन्न असलेल्या गटाला लघु कर्जांचे वाटप कंपनी करते.
कंपनींच्या एकूण ४७१ शाखा, ९१ विक्री कार्यालये आहेत.आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल, नमुरा फायनांशियल अँडव्हायजरी, सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट या कंपन्या आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. आयपीओसाठी प्राईज बँड अजून निश्चित करण्यात आला नाही. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी या आयपीओतील ३५ टक्के समभाग गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहेत.