फक्त नोंदणी नव्हे, सप्तपदीविना हिंदू विवाह मान्य नाही : सर्वोच्च न्यायालय

हिंदू विवाह सोहळ्यातील विधींवर सर्वोच्च न्यायालाचा महत्त्वाचा निकाल

    01-May-2024
Total Views | 262

SC

नवी दिल्ली
: सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह (Hindu Marriage) सोहळ्याविषयी महत्त्वपूर्ण टीपण्णी केली होती. हिंदू विवाह हा सप्तपदीविना (Hindu Marriage Saptapadi) मान्य नाही. फक्त ववाह नोंदणी झाली आहे म्हणून लग्न झालं हे मान्य करता येणार नाही. वधु-वर जोपर्यंत सात पावलं चालून सप्तपदी पूर्ण करत नाही तोपर्यंत हिंदू विवाहाला मान्यता देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे क , "हिंदू विवाह हा अग्नीला साक्ष मानून सप्तपदी चालणे महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मीयांचा विवाह सोहळा एक पवित्र बंधन आहे. फक्त खानपान, पार्ट्या, नाचगाणे झाले म्हणजे लग्न पार पडले, असे म्हणता येणार नाही." यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक टीपण्णी केली होती, "लग्न सोहळ्यात सप्तपदी ही आवश्यक आहे. कन्यादान ही आवश्यक विधी नाही." (Supreme Court on Hindu Marriage)

'लाइव लॉ' या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या बीवी नागरत्ना आणि ऑगस्टाइन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 'हिंदू मॅरिज एक्ट १९५५' (Hindu Marriage Act 1955) च्या आधारे अशाच एका विवाहाची मान्यता रद्द केली आहे. ज्यात विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर पती-पत्नीची स्वाक्षरी होती. मात्र, दोघांनी लग्न सोहळ्याची कुठल्याही प्रकारची विधी पूर्ण केली नव्हती. दोघांच्याही घरच्यांनी विवाह नोंदणी करुन लग्न उरकलं होतं. मात्र, त्या जोडप्याला काही कारणास्तव लग्न मोडायचं होतं. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विवाह रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, विवाहाचे कुठलेही विधी पूर्ण न केल्याने त्यांचा हा विवाह रद्द करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले की, "जिथे हिंदू विवाह सप्तपदी (Hindu Marriage Saptapadi) सारखे संस्कार झाले नाहीत. तर विवाह अमान्य ठरेल, हिंदू विवाहातील सर्व विधी या पार पाडल्या गेल्याच पाहिजे, ज्यात सप्तपदीही सामील आहे. जर भविष्यात कुठलाही प्रकारचा वाद झाला तर सप्तपदींची विधी (Hindu Marriage Saptapadi) हा पुरावा म्हणून असेल. जर सप्तपदीविना कुणीही विवाह केला तर तो हिंदू मॅरेज अॅक्ट कलम ७ अनुसार हिंदू विवाह मानला जाणार नाही. वैवाहिक कार्यक्रमाशिवाय जर नोंदणी प्रमाणपत्र बनवले तर हिंदू विवाह कायद्याअंतर्गत हा विवाह मान्य होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, "जर सप्तपदीचा कुठलाही पुरावा नाही तर कलम ८ अंतर्गत विवाह नोंदणी अधिकारी अशा प्रकारचा विवाह सोहळा नोंदणीकृत करू शकत नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्न झाला असल्याचे प्रमाणपत्र असेल मात्र, तो विवाह सोहळा झाला होता याबद्दलचा पुरावा तर द्यावाच लागेल. फक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतले म्हणजे लग्न झाले असे मानता येणार नाही. त्यापूर्वी सप्तपदीची (Hindu Marriage Saptapadi) प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. त्याशिवाय त्या प्रमाणपत्राला काहीही अर्थ रहाणार नाही."

कन्यादानाविषयी न्यायालयाचे मत काय? (Kanyadan)

यापूर्वी २२ मार्च २०२४ रोजी उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला होता. कन्यादान ही हिंदू विवाह सोहळ्यातील अनिवार्य विधी नाही. हिंदू विवाह अधिनियम, १९५५ नुसार, (Hindu Marriage Act 1955) केवळ सप्तपदी हीच अनिवार्य विधी मानली गेली आहे. अलाहाबादच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुषाभ विद्यार्थी म्हणाले, "हिंदू विवाह अधिनियम १९५५ अंतर्गत सप्तपदी ही एकमात्र अनिवार्य विधी आहे. कन्यादान एक सांस्कृतिक विधी आहे. ज्यात वडील आपल्या मुलीला वराकडे सुपूर्द करतात. ही विधी पितृत्व ते स्त्रीत्त्व या यात्रेचे प्रतिक बनले आहे. कन्यादान (Kanyadan) एक महत्त्वाची विधी असू शकते मात्र, ही अनिवार्य नाही."

सप्तपदीविषयी न्यायालयाचे मत काय?

यापूर्वी २०२३ ऑक्टोबरमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही एका निकालात म्हटले होते की, सप्तपदी विना हिंदू विवाह सोहळ्यात सप्तपदीविना हिंदू धर्मात विवाह मान्य नाही. ही हिंदूंच्या विवाह सोहळ्यातील सर्वात मोठी मान्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ ऑक्टोबर २०२३ मध्ये हा निकाल दिला होता की, उच्च न्यायालयाने जर लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले आणि सप्तपदी घेतली नाही तर तो विवाह पूर्ण झाला असे हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अनुच्छेद ७ अंतर्गत अमान्य असेल. हिंदू विवाह तेव्हाच मान्य केला जातो ज्यावेळी लग्नाचे विधी पूर्ण होतील.
सप्तपदी म्हणजे काय? (What is Saptapadi?)
 
सप्तपदी हिंदू विवाहातील एक महत्त्वपूर्ण विधी आहे. अग्नी भोवती सात फेऱ्या घेतल्यानंतर सात वचने विवाह वधू-वराला दिली जातात. सप्तपदी ही सात फेऱ्यांचे वचनांचे प्रतीक मानले जाते. वधूवर एकमेकांना ही वचने देतात आणि आयुष्यभर ती पाळण्याची शपथही घेतात.

सप्तपदीची प्रक्रीया

मंगलाष्टके पूर्ण झाल्या आणि गळ्यात माळ पडल्यानंतर वर आणि वधूला अग्निपुढे उभे केले जाते. वर वधूचा उजवा हात आपल्या डाव्या हातात पकडतो. अशाप्रकारेच सात फेरे घेतले जातात. प्रत्येक फेरी घेताना एक दुसऱ्याला वचन दिले जातात. सातव्या फेरीनंतर वरवधू अग्निपुढे उभे एकत्र उभे राहतात.


सप्तपदीची वचने कोणती?


पहिले वचन : मी तुला माझा पती / पत्नी मानते.

दुसरे वचन : मी तुम्हाला माझा जीवसाधी मानते/मानतो.

तिसरे वचन : मी तुझ्या सुखासाठी जीवन जगण्याचे वचन देतो/देते.

चौथे वचन : मी तुझ्या इच्छांचा सन्मान करण्याचे वचन देतो/देते.

पाचवे वचन : मी तुझे रक्षण करण्याचे वचन देतो/देते.

सहावे वचन : मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करण्याचे वचन देतो/देते.

सातवे वचन : मी तुझ्या वाईट काळात सोबत रहाण्याचे वचन देतो/देते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121