केजरीवालांना उच्च न्यायालयाने फटकारले, मद्य धोरणात वैयक्तिक सहभाग!

    09-Apr-2024
Total Views | 73
delhi-high-court-arvind-kejriwal-cm-liquor-scam
 
 

नवी दिल्ली :      दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. उच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन देण्यास नकार दिला आहे. केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, आपली अटक पीएमएलए कायद्याच्या कलम १९ चे ईडीने उल्लंघन केले आहे.

न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा म्हणाले, ईडीने गोळा केलेल्या तथ्यांवरून असे दिसून येते की अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मद्य धोरण तयार करण्याचा कट रचण्यात ते सहभागी झाले आणि त्यानंतर या गुन्ह्यातील रक्कम वापरली. असा न्यायालयाने सांगत त्यांची जामीन याचिका फेटाळली आहे.


हे वाचलंत का? - शशी थरुर परत जा, तुम्हाला मत नाही, केरळमधील जनतेचा विरोध!


दिल्लीतील मद्य धोरण कठोर बनवणे आणि लाच मागणे यात त्यांचा वैयक्तिक सहभाग असून केजरीवाल या गुन्ह्यातही सहभागी आहेत, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्यात सरकारी साक्षीदार झालेल्या आरोपींबाबत न्यायालयाने सांगितले की, यासंबंधीचा कायदा १०० वर्ष जुना असून याचिकाकर्त्यांना खोट्याच्या जाळ्यात अडकवण्याचा हा कायदा आताचा नाही. अरविंद केजरीवाल यांना साक्षीदारांची उलटतपासणी करण्याचा अधिकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

निवडणूक लढवण्यासाठी कोण तिकीट देतो आणि निवडणूक रोखे कोण विकत घेतो हा आमच्या चिंतेचा विषय नाही, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, तपास यंत्रणेला एका व्यक्तीच्या सोयीनुसार तपास करण्याचे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत, ती स्वतःच्या सोयीनुसार काम करेल. सामान्य माणूस आणि मुख्यमंत्र्यांसाठी वेगळे कायदे असू शकत नाहीत, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.



अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121