खुशखबर! 'सूर्य तिलक' लावण्यात वैज्ञानिकांना आले यश

    09-Apr-2024
Total Views | 406

Ramlala Surya Tilak

मुंबई (प्रतिनिधी) :
अयोध्येत मोठ्या उत्साहात होणाऱ्या रामनवमीला श्री रामललांच्या कपाळावरील 'सूर्य तिलक' (Surya Tilak) खास आकर्षण असणार आहे. ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीसाठी विशिष्ट उपकरणे लावली असून वैज्ञानिकांना 'सूर्य तिलक' आणण्यात यश आले आहे. श्री रामलला मंदिराचे दर्शन प्रभारी गोपालजी यांनी याविषयी माहिती दिली.

हे वाचलंत का? : छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिनानिमित्त जय शंभूराया मैफिल


Gopalji Ayodhya

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी, उत्तराखंडच्या वैज्ञानिकांची टीम या कामात गेले काही दिवस व्यस्त होती. प्रभू श्रीरामललाच्या कपाळाचे अचूक स्थान सुनिश्चित करण्यासाठी एक स्टिकर लावण्यात आले होते. वैज्ञानिकांनी केलेल्या चाचणीदरम्यान प्रभू श्री रामलल्लाच्या कपाळी चार मिनिटे सूर्य तिलक आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजताही सर्वांना ते पाहता येईल, असा विश्वास गोपालजीनी व्यक्त केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121