मुंबई मेट्रोचे ‘कंट्रोल’आता आयएएस रूबल अग्रवाल यांच्या हाती !

    08-Apr-2024
Total Views | 54
mmocl


मुंबई, दि.८ : प्रतिनिधी : 
राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या 'कमिशनर' राहून म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस रुबल अग्रवाल यांच्याकडे आता मुंबई मेट्रोचे 'कंट्रोल' देण्यात आले आहे. 'एमएमआरडीए'तील अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली असून, त्यातर्गंत अग्रवाल यांच्याकडे महा मुंबई मेट्रो ऑपेरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे. अग्रवाल यांच्या नेमणुकीने मुंबई मेट्रो आता आणखी 'फास्ट' होण्याची आशा आहे. याआधी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता तो आता अग्रवाल यांनी घेतला आहे.
दरम्यान, रुबल अग्रवाल यांनी आपल्या पदाचा कार्यभार आयुक्त डॉ. मुखर्जी यांच्याकडून सोमवार दि. ८ रोजी स्वीकारला. रुबल अग्रवाल यांनी राज्यात यापूर्वी १५ ते १६ वर्षांत रुबल अग्रवाल यांनी वेगवेगळ्या खात्यांत काम केले आहे. त्या २००८ बॅचच्या 'आयएएस' (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी आहेत. या काळात त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांच्याकडे शिर्डी संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी होती. त्यानंतर, २०१९ मध्ये अग्रवाल यांची पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. या काळात त्यांच्याकडे महापालिकेतील आरोग्य खात्यासह महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी राहिली. याचदरम्यान कोरोना साथ आली.
सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या पुण्यातील आरोग्य व्यवस्था व्यापक करून, कोरोना नियंत्रण ठेवण्याची मोहीमही अग्रवाल यांच्याकडे राहिली. या साथीत महापालिकेचे ७२ रुग्णालयांत उपचार व्यवस्था उभारण्यापासून जम्बो कोविड सेंटरही त्यांची सांभाळले. अतिरिक्त आयुक्त, जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुखपदाची जबाबदारी असतानाच ऐन कोविडच्या काळात अग्रवाल यांच्याकडे पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या 'सीईओ' म्हणून नेमणूक करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी संकल्पनेतून उभारलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पा योजनांना गती देण्यात अग्रवाल यांचा पुढाकार राहिला. पुण्यात महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर अग्रवाल यांची राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली. अग्रवाल यांनी महिला आर्थिक विकास महामंडळात देखील त्यांनी काम पहिले. त्यापलीकडे जाऊन मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या मेट्रोला अधिक गतीमान करण्यासाठी अग्रवाल यांची 'एमएमआरडीए'त बदली झाली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121