संजय निरुपम यांचे राऊतांवर पाच आरोप! वाचा सविस्तर!
08-Apr-2024
Total Views | 56
मी मासांहार सोडलाय. तुरुंगात जाण्यासाठी योग्य कपडे खरेदी केलेत. ईडीने माझे खाते गोठवण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या बचतीबद्दल माझ्या कुटुंबाला सांगितले आहे. त्यामुळे बहुतेक वेळा, तुरुंगात जाण्याची भीती तुरुंगापेक्षा जास्त असते. मुळात आर्थिक अनियमितता प्रत्येक गोष्टीत असते. पण त्याला आर्थिक गुन्ह्याचे रुप देऊ नये, असे विधान ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांनी ईडीने पाठवलेल्या समन्ससंबधी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर केलयं. दरम्यान मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलेला आहे. संजय निरुपम यांनी दि. ८ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खिचडी घोटाळ्याशी संबधित अनेक आरोप केले आहेत. यात त्यांनी कथित खिचडी घोटाळ्याच्या मुख्य आरोपीचे ही नाव घोषित केले आहे. तर दुसऱ्या बाजूला खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे खिचडी घोटळ्यात आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे? या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
दि. २७ मार्च २०२४ ला ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकरांची उमेदवारी जाहिर झाली तर दुसरीकडे खिचडी चोराचा प्रचार करणार नाही, काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी किर्तीकरांवर टीका केली. यात निरुपम यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपांबद्दल जाणून घेऊ. पहिला आरोप म्हणजे, २०० ग्रॅम खिचडीचा घोटाळा. मुळात मुंबई महानगरपालिकेने कोविडकाळात गरिब कामगार, मजूरांसाठी ३३ रुपयात ३०० ग्रॅम खिचडीचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. पंरतु पुढे सह्याद्री रिफ्रेशमेंटला कंत्राट देऊन १६ रुपयात १०० ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक खिचडी पाकिटातून २०० रुपायांची खिचडी चोरी करण्यात आली, असा दावा निरुपम यांनी केला आहे.म्हणजे महानगरपालिकेकडून सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी ३३ रुपयात ३०० ग्रॅम खिचडी वाटपाचे कंत्राट घेते. पण वास्तविक १६ रुपयांची १०० ग्रॅम खिचडीचं कामगार आणि मजूरांना दिली जाते. त्यामुळे निरुपम यांनी अमोल किर्तीकरांना खिचडी चोर म्हटले आहे.
त्यानंतर निरुपम यांनी केलेला दुसरा आरोप म्हणजे, संजय राऊतांनी या घोटाळ्यासाठी कुटुंबाचा आणि निकटवर्तीयांचा वापर केला. मुळात मागे किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानुसार, खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत, भाऊ संदिप राऊत यांची ही नावे समोर आली होती. त्यात आता निरुपम म्हणाले की, विधीता राऊत यांच्या खात्यावर २९ मे २०२० रोजी ३ कोटी ५० लाख रु. २६ जुन २०२० रोजी ५ लाख रु. ४ ऑगस्ट २०२० ला १ लाख २५ हजार आणि २० ऑगस्ट २०२० रोजी ३ लाख रु. आले."म्हणजे जवळपास विधिता संजय राऊत यांच्या खात्यावर खिचडी घोटाळ्याशी संबधित १२ लाख ७५ हजार रुपये आले आहेत. तसेच संजय राऊत यांचे भाऊ संदिप राऊत यांच्या खात्यात १० ऑगस्ट २०२० ला ५ लाख रु.२० ऑगस्ट २०२० ला १ लाख ४५ हजार रुपये आले. म्हणजे संदिप राऊत यांच्या खात्यात ६ लाख ४५ हजार रुपये कथित खिचडी घोट्ळ्याच्या रुपाने जमा झाले.त्याचबरोबर कोविड घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या सुजीत पाटकर यांच्या खात्यात १५ जुलै २०२० ला १४ लाख रुपये, ५ ऑगस्ट २०२० ला १४ लाख , २९ ऑक्टोंबर २०२० ला १० लाख रुपये, १७ डिंसेबर २०२० रोजी १ लाख ९० रुपये. त्याचबरोबर १२ जानेवारी २०२१ ला १ लाख ९० हजार रुपये आले.म्हणजे जवळपास ४१ लाख ८० हजार रुपये कोविड घोटाळ्यासंबधी पैसे पाटकर यांच्या खात्यात जमा झाले आहे.
पंरतु विधिता राऊत आणि संदिप राऊत यांना या पैशांची काही कल्पना ही नसेल अशावेळी राऊतांनी मुलगी आणि भावाच्या नावावर पैसे घेतले, असा आरोप करत या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राऊत असल्याचं निरुपम म्हणाले. त्याचबरोबर राऊतांच्या कुटुंबाने एकूण १ कोटींची दलाली घेतली, असे ही निरुपम म्हणाले.त्यानंतर केलेल्या तिसरा आरोप म्हणजे, कंत्राट चुकीच्या पद्धतीने मिळवण्यात आले. निरुपम म्हणाले, खिचडी वाटपाचे कंत्राट घेताना अर्जदारांकडे स्वतांचे किचन असणे गरजेचे असते. त्यामुळे सह्याद्री रिफ्रेशमेंटने जोगेश्वरी येथील पर्शियन दरबार रेस्टॉरेंटच्या किचनला आपले किचन असल्याचे सांगितले. पंरतु तपासात या हॉटेलच्या मालकाने सांगितले की, या प्रकरणाची मला कोणतीचं माहिती नाही. यासबंधी कोणताच करार करण्यात आलेला नाही. तसेच तपासाअंती दिलेल्या शपथपत्रात आपल्या हॉटेलचा आणि सह्याद्री रिफ्रेशमेंटचा काहीही संबध नसल्याचे सांगितले. म्हणजे कंत्राट मिळवण्यासाठी खोटी माहिती दिली आणि स्वत: खिचडी तयार न करता सबकॉन्ट्रेक्ट देऊन खिचडी घोटाळा केला, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.
दरम्यान निरुपम यांनी केलेला चौथा आरोप म्हणजे, संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. संजय राऊतांनी खिचडी घोटाळ्याशी संबधीत दलालीचे पैसे आपल्या भावाच्या आणि मुलीच्या खात्यात चेकद्वारे घेतले. ज्यात आतापर्यंत संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांनी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तसेच सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात खिचडी घोटाळ्यासंबधी गुन्हा दाखल करण्यात आलाय.त्यानंतर पाचवा आरोप म्हणजे, अमोल किर्तीकरांना उमेदवारी देणारे भ्रष्टाचारी. निरुपम म्हणाले की, या निवडणुकीत अमोल किर्तीकर यांच्या विरोधात खिचडी घोटाळ्याचा मुद्दा घेऊन मी मैदानात उतरणार आहे, असे निरुपम म्हणाले. तसेच ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्यात कदम नावाच्या व्यक्तिचे नाव होते. मात्र कदम नावाची अशी कोणतीही व्यक्ती नाही, मात्र टेंडर त्यांच्या नावे देण्यात आली. दरम्यान घोटाळा होतं असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करून गरीबाच्या पाठिशी असल्याचे सांगत होते, असा टोला ही निरुपम यांनी लगावला आहे.
तरी या प्रकरणात समन्स बजावल्यावर अमोल किर्तीकर ईडीसमोर हजर झालेले आहेत. यावेळी ईडी कार्यालयात जाताना त्यांनी आपल्या खात्यात पैसे आल्याचे मान्य केले. पण ते पैसे कोणत्या गोष्टीशी सबंधित होते, हे चौकशीत सांगणार असल्याचे किर्तीकर म्हणाले. तसेच याआधी त्यांनी माझ्यासोबत ७० ते ८० विक्रेते होते, पण काही निवडक लोकांवर आरोप केले जात असल्याचे विधान केले होते. त्याचप्रकारे आर्थिक अनियमितता म्हणजे आर्थिक गुन्हा नव्हे, असा अजब तर्क ही त्यांनी मांडलेला पाहायला मिळाला.