संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार : संजय निरुपम

    08-Apr-2024
Total Views | 68
 
Raut & Nirupam
 
मुंबई : संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे सुत्रधार आहेत. ज्यावेळी ते पत्राचाळ घोटाळ्यात सापडले त्यावेळी त्यांनी त्यांची मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावाने पैसे घेतल्याचे तपासात पुढे आले आहे, असा खुलासा नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत खिचडी चोरांची पोलखोल केली.
 
संजय निरुपम म्हणाले की, "संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार आहेत. कोरोना काळात सह्याद्री रिफ्रेशमेंट या कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपयांच्या खिचडीचा पुरवठा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या कंपनीकडून संजय राऊतांच्या परिवाराने आणि त्यांच्या मित्राने १ कोटी रुपये दलालीच्या स्वरुपात घेतले होते. याशिवाय परळ येथील वैष्य सहकारी बँकेतील खात्यातून राऊतांनी त्यांची मुलगी विदीता राऊत हिच्या नावाने चेकद्वारे लाच घेतली."
 
"तसेच सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीकडून राऊतांचे भाऊ संदीप राजाराम राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या खात्यातही चेक आले. सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला ३३ रुपयांत ३०० ग्रॅम खिचडी मोफत वाटण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. कोरोना काळात सर्वत्र हाहाकार माजलेला असताना गरीब लोकांना मोफत अन्न वाटपाची योजना मुंबई महापालिकेने सुरु केली होती. मात्र, सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीने काही उपकंत्राट देऊन १६ रुपयांत १०० ग्रॅम खिचडी वाटपाचे कॉन्ट्रॅक्ट दिले. म्हणजेच गरीबांच्या खिचडीतील २०० ग्रॅम खिचडी त्यांनी चोरी केली," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "हा सगळा खिचडी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आहे. त्यामुळे ईडीने आपल्या तपासाचं जाळं वाढवून सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीने केलेल्या घोटाळ्यासाठी संजय राऊतांना अटक करावी. संजय राऊत हेच या सगळ्याचे मुख्य सुत्रधार आहेत," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..