मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाबळेश्वरमध्ये रविवार दि. ७ एप्रिल रोजी पिसूरा हरिणाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे (mouse deer poaching). मोळेश्वर फाटा ते सह्याद्री नगर रस्त्यावर वनविभागामार्फत गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस आला(mouse deer poaching). सातारा वनविभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये त्यांच्याकडे आढळलेले पिसूरी हरिण आणि बंदूक ताब्यात घेण्यात आली आहे. (mouse deer poaching)
वनकर्मचारी रात्र गस्त घालत असताना मोळेश्वर फाटा ते सह्याद्री नगर रस्त्यावर त्यांना दोन असम आढळले. यांची चौकशी केली असता त्यांच्या हातातील पिशवीमध्ये वाघर, कोयता, काडतूस अशा वस्तू आढळून आल्या. या वस्तू आढळल्यामुळे अधिक कसून चौकशी केल्यानंतर आणखी दोन आरोपिंचा शिकारीमध्ये सहभाग असून त्यांनी पिसूरी हरिणाची शिकार केल्याचे उघड झाले.
पिसूरी हरिणाच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक तसेच मृत पिसूरी हरिण वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून शिवाजी शिंदे, दिपक शिंदे, आदित्य शिंदे आणि गणेश कदम अशी या आरोपींची नावे आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ नुसार या चारही आरोपिंवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये सातारा वनविभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजूर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, अर्जून गंबरे, निलेश राजपूत, अर्चना शिंदे, रमेश गडदे, अभिनंदन सावंत, लहू राऊत, स्वप्निल चौगुले, राहूल धुमाळ, स्नेहल शिंगाडे, संगीता शेळके, संदीप पाटोळे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पूढील तपास महाबळेश्वरचे वनपरिक्षत्र अधिकारी गणेश महांगडे करत आहेत.