ओवैसी बोगस मतांनी विजयी होतात, भाजपच्या फायरब्रँड महिला नेत्याचा आरोप!
07-Apr-2024
Total Views | 116
नवी दिल्ली : एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात भाजपच्या माधवी लता या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपकडून लोकसभा उमेदवार असलेल्या माधवी लता तेलंगणाबाहेर अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांची मुलाखत पत्रकार रजत शर्मा यांनी इंडिया टीव्ही शो 'आप की अदालत'मध्ये त्यांची मुलाखतदेखील घेतली आहे.
दरम्यान, माधवी लता यांच्या मुलाखतीच्या क्लिप खूप व्हायरल होत आहेत. हैदराबादमध्ये गेल्या ४ दशके ओवैसी कुटुंबांचा वरचष्मा राहिलेला आहे. आता भाजपकडून ओवैसींच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी माधवी लता यांना ओवैसींविरोधात उभे केले आहे. याआधी असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ६ वेळा विजयी झाले. असदुद्दीन ४ वेळा ही जागा जिंकून संसदेत पोहोचले आहेत.
हैदराबादच्या रस्त्यांवर प्रचार करण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, गरीबांना मदत करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्या चेंगीचेर्ला येथे दौरा केला होता, जिथे होळी खेळणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्यात आले आणि कट्टरपंथीयांकडून दगडफेक करून त्यांना जखमी करण्यात आले. माधवी लता म्हणाल्या की, हा परिसर आपल्या भागात नसतानाही पीडित महिला असल्याने मदतीसाठी गेले. त्यांची गाडी थांबवण्यात आली आणि त्यांना जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले.