राऊतांनी नौटंकी थांबवावी! पटोलेंनी झापलं

    07-Apr-2024
Total Views | 76

Nana Patole & Sanjay Raut
 
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन खडाजंगी रंगलेली आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच झापलं. संजय राऊतांनी आपली नौटंकी थांबवावी, असा सल्ला पटोलेंनी दिला आहे. त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
नाना पटोले म्हणाले की, "संजय राऊत यांनी आपली नौटंकी थांबवावी. खरंतर ते शिवसेनेचे एक मोठे नेते आहेत. त्यांनी काय बोलावं याच्या मर्यादा ठेवाव्यात. मी वारंवार सांगतोय की, हा प्रश्न आम्ही वरिष्ठ पातळीवर सामोपचाराने सोडवू. त्यामुळे संजय राऊतांनी एका छोट्या कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करु नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. येत्या एक दोन दिवसांत या सगळ्या प्रश्नांवर आम्ही पडदा टाकू," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  बारामतीत शरद पवार गटाला मोठा धक्का! सुप्रिया सुळेंचा प्रचारक दादा गटात
 
वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांनी आज ३ वाजेपर्यंत आम्हाला प्रस्ताव दिल्यास आम्ही याबाबत निर्णय घेऊ शकतो," असेही त्यांनी सांगितले.
 
सांगली लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीचा तिढा कायम आहे. काँग्रेस आणि उबाठा या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे. या जागेवरून काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वाद सुरु आहे.
 
उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असून आता ते नाना पटोलेंचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
इफ्तार नाही!

इफ्तार नाही! 'फलाहार पार्टी' देणार दिल्ली सरकार

दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारने रमजानच्या काळात होणाऱ्या इफ्तार पार्टीच्या धर्तीवर फलाहार पार्टी आयोजित करण्याचे योजीले आहे. दिल्ली सरकार पुढील दोन आठवडे हिंदू नववर्ष साजरे करणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच ३० मार्च रोजी हिंदू नववर्षानिमित्त विधानभवन परिसरात संध्याकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासून त्याची सुरुवात होईल आणि १४ एप्रिल आंबेडकर जयंतीला त्याची सांगता होईल. दिल्लीतील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होतील. विशेष म्हणजे कला आणि संस्कृती मंत्रालयच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121