एकनाथ खडसे भाजपमध्ये! 'या' दिवशी होणार पक्षप्रवेश

    07-Apr-2024
Total Views | 145
 
Eknath Khadse
 
मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली. त्यामुळे आता एकनाथ खडसेंची पुन्हा घरवापसी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
 
एकनाथ खडसे म्हणाले की, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या १५ दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, असा माझा प्रयत्न आहे. माझा भाजप प्रवेश हा दिल्लीला होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून ज्या दिवशी मला बोलवणं येईल त्यादिवशी दिल्लीला माझा प्रवेश होईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा बाणा असेल तर..."; राणेंचे आव्हान
 
"भाजपच्या जुन्या नेत्यांशी बोलताना तुम्ही भाजपमध्ये आलात तर बरं होईल अशा चर्चा माझ्याबाबतीत होत होत्या. या दृष्टीकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही अशी मी त्यांना विनंती केली होती. त्यानुसार आता मी निर्णय घेतला आहे," असेही ते म्हणाले.
 
एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आता येत्या १५ दिवसांत दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची घरवापसी होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
चित्रपटात काम करणे म्हणजे त्याआधी.. संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहा नाईकने घेतले वाणी प्रशिक्षण!

"चित्रपटात काम करणे म्हणजे त्याआधी.." संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहा नाईकने घेतले वाणी प्रशिक्षण!

भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संत मुक्ताईची भूमिका ती साकारणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत ..