मनीष सिसोदिया यांना कोर्टाचा दणका!, १८ एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ
06-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातच राहावे लागणार आहे. दरम्यान, सदर प्रकरण दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात सुरू असून आता सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडी १८ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ एप्रिलला न्यायालयात होणार आहे.
दरम्यान, प्रत्येक आरोपीने कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आतापर्यंत किती वेळ घेतला हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाकडून सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून देण्यात आले आहेत. अटकेत असलेले मनीष सिसोदिया न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान, ईडी व आरोपी पक्षाकडून २०७ सीआरपीसीचे पालन करण्यास विलंब झाल्याबद्दल प्रतिवाद करण्यात आला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी न्यायमूर्तींकडून कागदपत्रांची तपासणीला झालेल्या विलंबाबाबत विचारणा करण्यात आली. प्रत्येक आरोपीला कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आतापर्यंत किती वेळ लागला, याचे उत्तर ईडीकडून मागण्यात आले आहे. आता पुढील सुनावणी १८ एप्रिलला होणार आहे. दरम्यान, ईडी आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणांमध्ये आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या दुसऱ्या जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयात सुनावणी सुरू होती.
पतपडगंजच्या लोकांना लिहिले पत्र आले बाहेर
मनीष सिसोदिया यांनी पटपडगंजच्या लोकांना पत्र लिहित आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येईल, असे म्हटले होते. सिसोदिया यांनी लिहिले होते की, आम्ही गोऱ्या इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढलो होतो आणि आज आम्ही इंग्रजांविरुद्धही लढत आहोत. विशेष म्हणजे मनीष सिसोदिया यांनी हे पत्र दि. १५ मार्चलाच लिहिले होते, मात्र, आपकडून हे पत्र गुप्त ठेवण्यात आले होते. आता दि. ०५ एप्रिल रोजी मनीष सिसोदियांचे पत्र सार्वजनिक करण्यात आले आहे.