प्रभू श्रीरामांबद्दल घृणास्पद वक्तव्य, ब्राम्हणद्वेषानं भरलेली भाषणं देतोयं रुद्र आणि राकेश कुशवाहा!

    06-Apr-2024
Total Views | 362
Rudra Pratap Kushwaha provokes SC-STs against Brahmins
 
 
नवी दिल्ली : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अनेक नेत्यांची हिंदूविरोधी वक्तव्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान यावेळी स्वत:ला वंचित घटकांचे नेते म्हणवणाऱ्या रुद्र प्रताप कुशवाह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुशवाह ब्राह्मणांच्या हत्येबाबत विधान करत आहेत.




व्हायरल व्हिडिओमध्ये कुशवाह म्हणतात- “अब देश में हिंदू मुस्लिम नहीं, बैकवर्ड और फॉर्वर्ड दंगा करेगा तुम लोगों को भारत से भगाने के लिए। आगे कुशवाहा कहता है कि इन 2 फीसद ब्राह्मणों को देश से खदेड़ कर मारिए।“


 

ते पुढे म्हणतात – “न हिंदू खतरे में है, न मुसलमान खतरे में है, न गीता खतरे में न कुरान खतरे में है। अरे सही से अपनी आँखों से धर्म का चश्मा उतारकर देखो, इन 2 % ब्राह्मणों के कारण पूरा हिंदुस्तान खतरे में है।”

दरम्यान कुशवाहाचे इतर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देश चालवायचा असेल तर मुस्लिमांना देशातून हाकलून देण्याची गरज नाही, ब्राह्मणांना देशातून हाकलूनच संपवले पाहिजे, असे या व्हिडिओंमध्ये ते म्हणतात.


तसेच त्यांनी मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाक कायदा बनवण्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. तसेच कुशवाह यांनी हिंदूंच्या देवी-देवतांवरही प्रश्न उपस्थित करत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याबद्दल ही आक्षेपार्ह विधान केले आहे.




रुद्र प्रताप कुशवाह हे युवा विचार मंच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते वेळोवेळी ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्ये करत असतात. तसेच युवा विचार मंच संरक्षण राकेश कुशवाह हे देखील अशा आक्षेपार्ह विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. राकेश कुशवाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते म्हणतात, “पंडित, ब्राह्मण आणि पुजारी यांच्या मुलीशी लग्न करा आणि त्यांचे शुद्धीकरण करा. कोर्ट केसचा सर्व खर्च मी देईन. मी लढेन. माझ्यावर कोणाचाही बाप गुन्हा दाखल करणार नाही,असे विधान त्यांनी केले.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121