मुंबई: एडुटेक कंपनी बायजूजच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. बायजूजने ४२ दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. मध्यस्ताने (Arbitrator) कंपनीला काही समभाग (शेअर्स) न विकण्याचे आदेश दिले आहेत.
कंपनी अनेक आरोपांना सामोरे जात असताना काल बायजूज सीईओ बायजूज रविंद्रन यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी घट झाली होती. यामध्ये फोर्ब्स यादीतील त्यांचे नाव गेले असू़न त्यांची मालमत्ता एक आकडी उरली आहे. या पार्श्वभूमीवर अब्जाधीश डॉक्टर रंजन पै यांच्या कार्यालयाने बायजूज विरोधात कर्जाचे पैसे न चुकवल्याने आकाश एज्युकेशन या बायजूज समुह कंपनीच्या काही समभागांची परतफेड न केल्याबद्दल तसेच पूर्व संमत हस्तांतरणाद्वारे ४२ अब्ज डॉलरची परतफेड न केल्याबद्दल लवादाची कार्यवाही पै यांनी मार्च महिन्यात सुरू केली होती.
याविषयी मध्यस्ताने सिंगापूर इंटरनॅशनल आरबिट्रेशन सेंटरकडे या प्रकरणाची गळ घालत बायजूजला ४ दशलक्ष किंमतीचे समभाग न विकण्याचे आदेश दिले होते.करारानुसार ही रक्कम कर्जाच्या तुलनेत ६ टक्के रक्कम होती.यावर मध्यस्थांनी कर्जाचा करार मोडल्या प्रकरणी ताशेरे ओढले आहेत. प्रसारमाध्यमांच्या सुत्रांच्या माहितीप्रमाणे रविंद्रन पै यांच्या एमइएमजी (MEMG) यांच्याशी अडचण सोडवण्यासाठी चर्चेत असल्याचे म्हटले आहे.
मात्र हस्तांतरणासाठी अजून भागभांडवलधारकांकडून परवानगी न मिळाल्याचे बायजूजकडून सांगण्यात आले आहे.२०२२ पर्यंत बायजूजची गणती सर्वात मोठ्या स्टार्टअपमध्ये होत असे. २०२२ मध्ये बायजूजचे मूल्यांकन २२ अब्ज डॉलर होते. कंपनी गैरव्यवहार व तसेच कंपनीच्या गैर व्यवस्थापनाबाबत बायजूजची चौकशी सेबीने सुरू केली होती.