टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; रिषभ पंतचे पुनरागमन
30-Apr-2024
Total Views | 413
मुंबई : १ जुनपासुन सुरु होणाऱ्या टि २० विश्वचषकासाठी ( t20 world cup 2024 ) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडीज आणि य़ुएसए येथे केले जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वात बिसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेमध्ये एकुण २० संघ सहभागी होणार आहेत. रोहीत शर्मा कर्णधार आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार सोबत विराट कोहली, जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा हे सिनियर खेळाडु असणार आहेत.
यशस्वी जैसवाल, शिवम दुबे, संजु सॅमसन, अर्शदिप सिंह यांनाही या विश्वचषकासाठी संघात निवडण्यात आले आहे. अपघातानंतर बराच वेळ भारतीय संघातुन बाहेर राहीलेला ऋषभ पंत देखिल आता संघात पुनरागमन करणार आहे. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांने भारतीय संघात जागा मिळवली आहे.
यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादव आणि रविंद्र जडेजा आणि अक्सर पटेल या दोन फिरकी जोड्या ही आपल्याला पहायला मिळणार आहे. युझवेंद्र चहल सुद्धा बराच काळ भारतीय संघापासुन लांब राहीला होता परंतु आता त्याचेही पुनरागमन झाले आहे. जलद गोलंदाजीची धुरा जसप्रित बुमराहच्या खांद्यावर असेल तर त्याला अर्थदिप सिंह आणि मोहम्मद सिराज यांची साथ लाभणार आहे.
के, एल राहुल, ऋतुराज गायकवाड, रियान पराग यांनी देखील आयपीएल मध्ये चांगली कामगीर केली आहे त्यामुळे त्यांची नावे या यादित येण्याची चर्चा होती. परंतु यांना यावेळी संघात स्थान मिळवता आलेले नाही. शुभमन गिल, रिंकु सिंग, खलिल अहमद आणि आवेश खान यांना राखिव खेळाडु म्हणुन स्थान देण्यात आले आहे.
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2024 announced 🚨