काँग्रेसला मोठा धक्का!, ऑलिम्पिक विजेता खेळाडू भाजपात दाखल!
03-Apr-2024
Total Views | 84
नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विंजेदर सिंगने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करत विंजेदर सिंगने आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. आता काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपमधील वरिष्ठांच्या उपस्थितीत विजेंदरने पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान, विजेंदर सिंग भाजपात प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता जाहीर प्रवेश केला आहे.
काँग्रेस पक्षात असताना विजेंदर सिंगला उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरुध्द उभे करण्यात आले होते. आता विजेंदर सिंग यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विजेंदरने काँग्रेससाठी सोशल मीडियावरही आवाज उठविण्यात आला होता.
विजेंदर सिंगच्या भाजप प्रवेशामुळे हरियाणासह दिल्ली व उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. तसेच, हरियाणातील जाट समाजात भाजपला आपली पकड मजबूत करण्यासाठी विजेंदर सिंगचा मोठा फायदा होऊ शकतो. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ करिता भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये विजेंदर सिंगचा समावेश होऊ शकतो.
भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी विजेंदर सिंगने काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर विजेंदरने २०१९ ची लोकसभा निवडणुकीची संधी देण्यात आली होती. परंतु, भाजपच्या रमेश विधुरीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. विजेंदरला १३.५६% (१.६४ लाख) मते मिळाली होती. तर तब्बल ५.२२ लाख मतांनी दारूण पराभव झाला होता.