उबाठा गटात दाखल झालेल्या उन्मेष पाटलांना जळगावची उमेदवारी नाहीच
ठाकरेंकडून दुसरी यादी जाहीर; उत्तर मुंबईबाबत निर्णय नाही
03-Apr-2024
Total Views | 80
मुंबई : जळगावमधून भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर 'उबाठा' गटात दाखल झालेल्या उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरें उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याऐवजी करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांतर करूनही उन्मेष यांच्या पदरी निराशाच पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मातोश्री येथे बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यानुसार, कल्याण येथून केदार दिघे यांच्याऐवजी वैशाली दरेकर, हातकणंगले सत्यजित पाटील. पालघर भारती कामडी आणि जळगावमधून करण पवार यांना तिकिट देण्यात आले आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत २१ उमेदवारांची घोषणा केली असून, उत्तर मुंबईबाबत निर्णय झाला नसल्याने हे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.