आगामी वित्तीय पतधोरणाचा परिणाम शेअर बाजारात होणार !

आरबीआयच्या पेपरमध्ये निरीक्षण नोंदवले गेले

    29-Apr-2024
Total Views | 41

RBI
 
 
मुंबई: यापूर्वी ६ सहा वेळा आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केलेला नाही. वित्तीय पतधोरण समितीने (Monetary Policy Committee) ने अर्थव्यवस्थेतील स्थैर्यासाठी हा निर्णय घेतला असताना आरबीआयने एक श्वेतपत्रिका काढलीआहे.त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या काळातील वित्तीय धोरणाचा परिणाम शेअर बाजारात अधिक होण्याची शक्यता आहे पतधोरणातील बदल सामान्य बाजारात पडण्यापेक्षा शेअर बाजारात अधिक पडण्याची चिन्हे आहेत.पतधोरणातील बदलाचा फरक वित्तीय बाजारात जाणवताना बाजारातील चढउतारावर पडू शकतो असे आरबीआय अधिकारी यांनी पेपरमध्ये म्हटले आहे.
 
बाजारातील विशेषतः पतधोरण जाहीर होणाऱ्या दिवशी बाजारातील समभागात मोठी चढ उतार होऊ शकते.बाजारातील उलाढालीत या वित्तीय धोरणांच्या घोषणेचा फरक जाणवू शकतो. हा पेपर आरबीआयच्या डिपार्टमेंट ऑफ इकोनोमिक अँड पॉलिसी रिसर्चमधील मयांक गुप्ता, सत्यम कुमार, अभिनंदन बोरड, सुब्रत कुमार यांनी बनवलेला आहे. बीएसईत गुंतवणूकीतील परतावा व परताव्यात चढ उतार यामुळे बाजारातील Overnight Indexed Swap (OIS) मध्ये फरक पडू शकतो असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
 
आरबीआयने २०११ साली आरबीआय वर्किंग पेपरची स्थापना केली होती.आरबीआयने सांगितल्याप्रमाणे, पेपरमधील व्यक्त केलेली मते ही लेखकांची वैयक्तिक असू शकतात त्यामध्ये आरबीआय मांडलेल्या मताशी सहमतच आहे असे नाही.यामध्ये लक्ष्य घटक (Target Factor) व पथ घटक (Path Factor) या दोन मानकांवर आधारित ही निरीक्षणे लेखकांनी नोंदवली आहेत.
 
अर्थात लक्ष्य घटक मध्यवर्ती बँकेच्या धोरण दर कृतीमध्ये आश्चर्यकारक घटक आत्मसात करतो, तर पथ घटक चलनविषयक धोरणाच्या भविष्यातील मार्गाबाबत बाजाराच्या अपेक्षांवर मध्यवर्ती बँकेच्या संवादाचा प्रभाव आत्मसात करतो.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121