
मुंबई: गेले काही दिवसांपासून डाबर कंपनीचे संस्थापक बर्मन कुटुंब व रेलिगेअर एंटरप्राईजच्या अध्यक्षा रश्मी सलूजा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असतानाच रश्मी सलुजांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले आहे.रश्मी सलूजा व बर्मन कुटुंब यांच्यात रेलिगेअर कंपनीच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणावरून वाद झाला होता. यावर बोलताना,'मी पूर्णपणे स्वतःच्या कामावर आत्मविश्वास बाळगते. बर्मन कुटुंबांनी केलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन करताना त्या म्हणाल्या, ' संचालक मंडळ व समभागधारकांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे.'
एनबीएफसी (विना बँकिग आर्थिक संस्थेचा) कठीण काळातही आम्ही चांगली कामगिरी केली आहे. माझ्या कामगिरीवर मला अभिमान असून कंफनीचाही मला पूर्ण पाठिंबा असल्याचे सलूजा यांनी म्हटले आहे.जानेवारी महिन्यात रश्मी सलूजा यांच्याविरोधात सेबीकडे चौकशी केल्याची मागणी केली होती. Employee Stock Ownership Plan (ESOP) बाबतीत सलूजा यांना ८ टक्के समभाग मिळाले होते यावर त्यामध्ये सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बर्मन कुटुंबांनी केला होता.
याआधी बर्मन कुटुंबानी रश्मी सलूजा यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगचा आरोप लावला होता.सलूजा यांच्याविरोधात आपले भागभांडवल वाढवण्यासाठी बर्मन कुटुंबांनी सातत्याने आपला हिस्सा समभाग विकत घेऊन वाढवत आहेत.बर्मन कुटुंबांनी २५ सप्टेंबर २०२३ ला भागभांडवल धारकांना समभाग विकत घेण्यासाठी खुली ऑफर दिली होती.याशिवाय बर्मन कुटुंबांनी सलूजा व सध्याच्या व्यवस्थापनावर गैर व्यवस्थापन व कॉर्पोरेट गव्हर्नन्स यामध्ये त्रूटी असल्याचा आरोप केला होता.
याबद्दल आरोपाना उत्तर देताना रश्मी सलूजा म्हणाल्या,'जर हे पाच वर्षांपूर्वी अनुभव नसताना बोलले असता ते समजणे स्वाभाविक होते. परंतु माझ्या चांगल्या कामगिरीनंतर कसे आरोप करण्यात तथ्य नाही. संपूर्ण कंपनीचा संचालक मंडळाचा मला पाठिंबा आहे व माझ्या केलेल्या कामगिरीचा अभिमान असल्याचे सलूजा यांनी मुलाखतीत म्हटले आहे.'
नियामक मंडळांना रेलिगेअर कंपनीच्या स्वतंत्र संचालक मंडळाने बर्मन कुटुंबावरही घोटाळ्याचे आरोप करत बर्मन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. बर्मन यांनी केलेल्या आरोपांचे सलूजा यांनी खंडन केले आहे.डिसेंबर २०, २०१९ पासून सलूजा स्वतंत्र संचालिका म्हणून रेलिगेअर कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.