ऑनलाईन क्रेडिट कार्डमधील व्यवहारात मोठी वाढ

इयर बेसिसवर २० टक्क्यांनी वाढ झाली आहे

    26-Apr-2024
Total Views |

credit card
 
 
मुंबई: ऑनलाईन क्रेडिट कार्डमधील व्यवहारात वाढ झाली आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार,आँनलाईन क्रेडिट कार्डवरील व्यवहार १०४०८१ कोटींवर पोहोचले आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मधील मार्चमध्ये ही संख्या ८६३९० कोटी होती. त्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी व्यवहारात वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ही संख्या ९४७७४ कोटी रुपये होती.
 
ऑफलाईन व्यवहारात मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी ही संख्या ५०९२० कोटी होती ती आता ६०३७८ कोटींवर पोहोचली आहे. एकूण क्रेडिट कार्ड व्यवहारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एकूण क्रेडिट कार्डची संख्या १० कोटींवर होती. मार्चअखेर ही संख्या १०.२ कोटींवर पोहोचली आहे. मागील वर्षी हे प्रमाण ८.५ कोटी होते.
 
बातमीप्रमाणे, यात सर्वाधिक वाटा एचडीएफसी बँक (२०.२%) असून त्यानंतर एसबीआय (१८.५%) आयसीआयसीआय बँक (१६.६%) एक्सिस बँक (१४ %) कोटक महिंद्रा बँक (५.८ %) नंबर लागतो.

क्रेडिट कार्ड व्यवहार का वाढत आहेत?
 
छोट्या छोट्या रक्कमासाठी वापरकर्ते क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. प्रत्यक्ष आँनलाईन अथवा ऑफलाईन क्रेडिट कार्ड व्यवहारात वाढ झाल्याने व्यवहारात वाढ झाली आहे.आता युपीआय मार्फत क्रेडिट कार्ड व्यवहार शक्य असल्याने लोकांचे क्रेडिट कार्ड व्यवहार वाढलेले दिसत आहेत.
 
दुसरीकडे डेबिट कार्डचा वापर घसरताना दिसत आहे. मार्च महिन्यात डेबिट कार्ड वापरात ३० टक्यांने (दुकानातील व्यवहारात) घट झाली आहे. तसेच ऑनलाईन बँकिंग डेबिट कार्ड व्यवहारात १७ टक्क्यांनी घट झाली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121