मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पांच्या कामाला वेग

सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याचा एमएसआरडीसीचा अंदाज

    24-Apr-2024
Total Views | 106

missing link
मुंबई दि.२४:  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरचा पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून या प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार आहे. सप्टेंबर २०२४ अखेरीपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असा अंदाज मुंबई रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मिसिंग लिंक या प्रकल्पांतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच केबल स्टॅड दरी पुलाचेही काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील १८० मीटर उंचीच्या केबल-स्टेड पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. बोगदे प्रत्येकी लांबी २३ मीटर रुंद आहेत असून हे बोगदे जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे आहेत. तर केबल-स्टेड ब्रिज हा देशातील सर्वात उंच आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे बोर घाटातील ६ किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. प्रकल्पातील बोगद्याची रुंदी २३.५ मीटर इतकी आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहापदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121