लोकसभेनंतर राज्यातील 'या' प्रमुख प्रकल्पांना गती

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात

    24-Apr-2024
Total Views | 53


road


मुंबई, दि.२४:
गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आणखी भर पडेल. अशातच भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावण्याच्या तयारीला वेग आला आहे. जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे अपडेट.

मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्प

५०८ किलोमीटर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लवकरच तिकीट प्रणालीसाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची निवड करण्यात येईल. हा सल्लागार जगभरातील बुलेट ट्रेन प्रकल्पांमध्ये वापरण्यात येत असलेल्या विद्यमान तिकीट प्रणालीचा अभ्यास करून मुंबई-अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्वोत्तम तिकीट प्रणालीचे पर्याय सुचवेल. यानंतर ही प्रणाली स्थानकांवर उभारण्यात येईल.

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी १४ कंपन्यांनी ३३ निविदा सादर केल्या आहेत. १२६ किलोमीटर लांबीचा हा रस्ते प्रकल्प ११ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. मात्र यापैकी केवळ ९८ किलोमीटरचेच काम करण्यात येणार आहे. एमएसआरडीसी नवघर ते बलवली अशा मार्गाची उभारणी करेल. तर बलवली ते अलिबाग दरम्यानचा टप्पा कोकण द्रुतगती महामार्ग प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विरार अलिबाग अंतर कमी करण्यासाठी विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे.

जालना-नांदेड प्रवेश-नियंत्रित महामार्ग

जालना-नांदेड हा सहापदरी प्रवेश-नियंत्रित महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतला आहे. या मार्गावरून १२० किमी प्रतितास वेग मर्यादेसह एक्सप्रेसवेची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १० स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी २३ निविदा सादर केल्या आहे. १७९.८५ किमी लांबीच्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे उत्तरी टर्मिनल ७०१ किमी लांबीच्या मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गावर (समृद्धी महामार्ग) असेल. हे दोन्ही प्रकल्प जोडले गेल्यामुळे नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ ११ तासांवरून ६ तासांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्प

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे व पिंपरी शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामासाठी १७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. पुणे रिंग रोड हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. हा रिंग रोड १७२ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा असेल. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १३६ किलोमीटर लांबीचे काम केले जाईल. हे काम ९ पॅकेजमध्ये करण्यात येईल. या प्रकल्पासाठी १२ स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी एकूण २६ निविदा सादर केल्या आहेत. राज्य सरकार राज्यात ५००० किलोमीटरचे एक्स्प्रेस वेचे नेटवर्क विकसित करण्याची योजना आखत आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतरच या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडल्या जातील.
अग्रलेख
जरुर वाचा
अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121