सरहदचे दुसरे विश्व साहित्य संमेलन अरागाम, काश्मीर येथे

विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजन समितीची घोषणा

    23-Apr-2024
Total Views | 46

sarhad 
 
मुंबई : सरहद, पुणे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथील प्रस्तावित जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव अरागाम, काश्मीरयेथे दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. संतसिंग मोखा (मुख्य संयोजक), दीपक बाली (आंतरराष्ट्रीय समन्वयक)अनुज नहार , सरहद, पुणे आणि सिराजुद्दीन खान, समन्वयक, बुक व्हिलेज अरागम बांदीपोरा, जम्मू-काश्मीर यांनी आज पुण्यात जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे
संत सिंग मोखा म्हणाले, "आम्ही जगभरातील पंजाबी लेखक, विद्वान आणि रसिकांना या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी अरागम, जम्मू आणि काश्मीर येथे विश्व पंजाबी साहित्य संमेलनात सामील होण्यासाठी आमंत्रित करणार आहोत ”.
जम्मू-काश्मीरमधील पुस्तकांच्या गावाची संकल्पनासरहद, पुणे यांचीआहे. दुसरे जागतिक पंजाबी साहित्य संमेलन हाआंतरराष्ट्रीय स्तरावर पंजाबी साहित्य, संस्कृती आणि भाषेचा उत्सव होणा आहे, ज्याचे स्थळ SKICC, श्रीनगर आणि वुलर लेक, बांदीपोरा हे आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. मात्र अंदाजे मार्च २०२५ असणार आहे.
 
सरहद, पुणे यांनी यापूर्वीआयोजित केलेले पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन, 2016 मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडले होते. मान्यवरांसह मा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या संमेलनाचे जाहीर कौतुक केले होते. दोन्ही नेत्यांनी पंजाबी भाषा आणि साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, तिचा समृद्ध वारसा आणि सीमा ओलांडून सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढवण्याच्या भूमिकेची कबुली दिली. ते संमेलन जगभरातील पंजाबी लेखक, कवी आणि विद्वानांसाठी महत्वाचे संमेलन ठरले होते.
 
अरागामयाकाश्मीरमधीलबांदीपोराजिल्हातीलगावाचेआणिसभोवतालचे शांत, निसर्गरम्यआणि समृद्ध साहित्यिक वातावरण, जगभरातील पंजाबी लेखक, कवी, विद्वान आणि रसिकांच्या या प्रतिष्ठित संमेलनासाठी आकर्षित करेल.या गावातील गावकऱ्यांनी सरहद संस्थेच्या प्रेरणेने घराघरात ग्रंथालये उभारली आहेत.
 
या संमेलनाचा उद्देश पंजाबी साहित्यातील विविधता आणि समृद्धता दर्शविणे आणि त्यातील सहभागींमध्ये संवाद आणि सहयोग वाढवणे आहे. दुसऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनात राज्या-राज्यांमधील आणि देश-देशांमधील गैरसमज आणि मतभेद दूर करण्याची मोठी क्षमता आहे.
 
काश्मीर आणि पंजाबसारख्या राज्यांमध्येसांस्कृतिक देवाणघेवाण आणि संवाद निर्माण करणे हाविश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा हेतू आहे. या संमेलनात जगभरातील निवडक पंजाबी तसेच इतर भाषिक साहित्यिकांनाहीनिमंत्रित करणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121