प्राध्यापक शिरीष केदारे यांची 'आयआयटी बॉम्बे'च्या संचालकपदी नियुक्ती!

    20-Apr-2024
Total Views | 62

IITB
 
 
मुंबई, दि. २० (विशेष प्रतिनिधी): पवईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईच्या संचालकपदी प्राध्यापक शिरीष केदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते आयआयटी बॉम्बेच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात चेअर प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स इन ऑइल, गॅस आणि एनर्जीचे प्रोफेसर इन-चार्ज होते. आयआयटी बॉम्बेचे संचालक म्हणून प्रा. सुभाषिस चौधरी यांचा कार्यकाळ दि. १७ एप्रिल रोजी समाप्त झाला. यानंतर शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी आयआयटी कौन्सिलने केदारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
 
केदारे यांनी १९८५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पदवी घेतली, त्यानंतर १९९२मध्ये. पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये औद्योगिक प्रक्रियांसाठी थर्मल एनर्जी स्टोरेजसह सौर तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि ऊर्जा संक्रमण मार्ग यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, त्यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये विविध पदांवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. त्यांना शिक्षण मंत्रालयाच्या आयआयटी परिषदेचे सदस्य म्हणूनही नामांकन मिळाले होते. ते आयआयटी मद्रासच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य होते. २००१ पर्यंत, प्रा. केदारे हे स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट, लातूरमधील विवेकानंद ग्रामविकास प्रकल्प आणि मुंबईतील सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रिन्युएबल मटेरियल्स अँड एनर्जी टेक्नॉलॉजीज (SARMET) यासह अनेक संस्थांचा भाग होते. याव्यतिरिक्त, ते मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि IIT बॉम्बे येथील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रुरल एरियाज (CTARA) चाही भाग आहेत. तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईचे योगदान मोठे आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121