अक्षय कुमार-अजय देवगन, बीग स्टार असूनही बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले ‘हे’ चित्रपट

    19-Apr-2024
Total Views | 29
बॉक्स ऑफिसवर आपली जागा तयार करण्यासाठी अजय देवगण आणि अक्षय कुमार फेल झाल्याचे दिसत आहे.
 

ajay akshay  
 
मुंबई : ९० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आले नसून बॉक्स ऑफिसवरही सपशेल आपटले आहेत. ११ एप्रिल रोजी ‘मैदान’ (Maidaan) आणि ‘बडे मियां छोटे मियां’ (Bade Miya Chote Miya) हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा फार थंड प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. जाणून घेऊयात या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल....
 
‘मैदान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ २.०६ कोटी कमवून ओपिनिंग केली होती. यानंतर दर दिवशी या चित्रपटाने जास्तीत जात एका दिवशी साडे सहा कोटी कमावले आहेत आणि प्रदर्शनापासून ते आत्तापर्यंत ८ दिवसांत या चित्रपटाने देशभरात केवळ २८.३५ कोटींचीच कमाई केली आहे. आणि जगभरात केवळ ४०.०५ कोटी कमावले आहेत. याउलट अजय देवगणच्या शैतान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४.५० कोटी कमवत ग्रॅंड ओपनिंग केली होती. अर्थात ‘शैतान’ या चित्रपटात मुख्य कलाकार हा आर. माधवन असल्यामुळे तसं पाहता ‘मैदान’ चित्रपट हा अजय देवगणचा या वर्षांतील प्रमुख कलाकार म्हणून पहिला चित्रपट असून तो देखील फारसा प्रेक्षकांच्या पसंतीस न आलेला दिसत आहे.
 
दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार जरी एका वर्षांत बरेच चित्रपट करत असला तरी त्याचे नशीब त्याला साथ देत नाही असेच दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून एकामागून एक अक्षयचे चित्रपट चालेनासेच झाले आहेत. आणि वडिल जरी सुपरस्टार असले तरी अजूनही टायगर जॅकी श्रॉफ आपली जागा हिंदी चित्रपटसृष्टीत बनवू शकला नाही हे दुर्दैवच. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ची प्रमुख भूमिका असून ११ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मैदान’ चित्रपटाला का होईना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर टक्कर दिली आहे, पण इतर चित्रपटांसमोर हा चित्रपट पडला आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाने १५.६५ कोटी कमवून ओपनिंग केली. आणि त्यानंतर आत्तापर्यंत देशभरात हिंदी भाषेतील या चित्रपटाने केवळ ४९.०९ कोटीच कमावले आहेत. तर जगभरात इतर भाषांमधील कमाई पकडून ८६ कोटींपर्यंत हा चित्रपट मजल मारु शकला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121