
मुंबई, दि.१९: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ५०८.१७ किमीच्या पॅकेज P1(C) साठी त्यांच्या पहिल्या ओपन वेब गर्डर (OWG) ट्रस ब्रिजचे लॉन्चिंग पूर्ण करण्यात यश आले आहे. एम जी कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.ने मागील आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण केले. वाहतूक नियंत्रण आणि पॉवर ब्लॉकचा वापर करून ९९.६ मीटर लांबीचा स्टील पूल भारतीय रेल्वेच्या गुजरातच्या वडोदरा विभागातील कंजरी बोरियावी आणि उत्तरसांडा स्थानकांदरम्यान च्या मेन-लाईन ट्रॅकवर संथगतीने बांधण्यात गेला. या पुलाचे वजन १४८६ मेट्रिक टन इतके आहे आणि मुंबई अहमदाबाद हायस्पीड प्रकल्पाच्या दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे लाईनवर ६२ अंशांच्या तिरकस स्थानावर अनेक रोलर्स आणि हायड्रॉलिक जॅक वापरून उभारण्यात आला आहे. गुजरातमधील गुडलक इंडिया समूहाने हा पूल तयार केला असून त्याची उंची १४.० मीटर आणि रुंदी १४.३ मीटर आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने या पुलासाठी ऑगस्ट २०२१ मध्ये २६१.२४ कोटींचा करार केला. पुलाच्या असेंब्ली आणि लॉन्चला आधार देण्यासाठी ट्रेस्टल उभारणीचे काम एक वर्षापूर्वी एप्रिल २०२३च्या सुरुवातीला सुरू झाले होते. अंदाजे ७०,८६५ मेट्रिक टन पोलाद या मार्गातील २८ स्टील पुलांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येईल.