समरसतेचे प्रतिबिंब प्रभू श्रीराम

    16-Apr-2024
Total Views | 64
ram 2
अयोध्येतील राममंदिरामध्ये दलित-वंचितांना प्रवेश नसल्याचा धादांत अपप्रचार विरोधक करताना दिसतात. त्यांच्या या दाव्यामध्ये तसूभरही तथ्य नाहीच. कारण, प्रभू श्रीरामांनी कधीही जातीभेद, वर्णभेदाला थारा दिला नाही. शबरीची उष्टी बोरे खाण्यापासून ते केवट राजाला मिठी मारण्यापर्यंत अशा कित्येक प्रसंगांतून श्रीरामांच्या जीवनातील समरसता प्रतिबिंबित होते. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या ‘समरसतेचे प्रतिबिंब प्रभू श्रीराम’ या विषयावरील भाषणाचे शब्दबद्ध केलेले हे विचार...
रामनवमी, प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस. भूतलावर त्यांच्या अवतरण्याचा हा दिवस. यंदाची रामनवमी अधिक आनंद घेऊन येत आहे. हिंदू समाजाच्या सामूहिक प्रयत्नाने ५०० वर्षं संघर्ष करून अयोध्येत प्रभू श्रीरामाला त्यांच्या जन्मस्थानी बांधलेल्या भव्य मंदिरात विराजमान केले आहे. याच दिवशी दुपारी ठीक १२ वाजता मंदिराच्या छतावरून येणारी सूर्यकिरणे रामललाच्या माथ्यावर अभिषेक करतील. ही आनंद अनुभण्याची वेळ आहे. प्रभू श्रीरामाच्या जीवनाचे स्मरण करण्याची ती वेळ आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृती समजून घेण्याची आणि तसे जीवन जगण्याची ती वेळ आहे. कारण, ते ‘मर्यादा पुरुषोत्तम’ होते. पुरुषांमध्ये उत्तम होते. त्यांची एकूण एक कृती आपल्या सर्वांसाठी समजून घेण्यासारखी व अनुकरणीय आहे.
 
ज्या सामान्य लोकांना ‘मागासवर्गीय’ म्हटले जाते, जनजातीचे असल्या कारणास्तव ज्यांना ‘वानर’ म्हटले जाते, अशांना प्रभू श्रीरामाने आपल्या आयुष्यात कसे आपलेसे केले? यासंदर्भात आपण काही जाणून घेणार आहोत. श्रीरामाच्या शिकवणीच्या काळापासून पाहिले, तर जेव्हा चारही मुले मोठी झाली आणि शिक्षण घेण्याचे वय आले, तेव्हा मनात विचार आला की काय करायचे? तेव्हा कैकयीचा आग्रह होता की, शिक्षण राजवाड्यात व्हावे, शिक्षकांनी तिथे येऊन शिकवावे. परंतु, ती गोष्ट स्वीकारली गेली नाही. उलट श्रीरामांना महर्षी ऋषींच्या जंगलातील आश्रमात जाऊन राहावे लागेल, असे ठरले. न्यूनतम परिस्थितीत राहणे आणि आश्रमातील कामांमध्ये हातभार लावणे, असे करत समाजातील अन्य लोकांसोबत राहून श्रीरामांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जमिनीवर झोपून, जंगलातून लाकडं गोळा करून अशी आश्रमातील सर्व कामे करून, दैनंदिन जीवनात सामान्य माणसाला काय अनुभव येतात, हे सर्व अनुभव त्यांनी बालपणीच आत्मसात केले.
 
एकेदिवशी विश्वामित्र जेव्हा अयोध्येत आले, तेव्हा ते म्हणाले, “जंगलांमध्ये दैत्यांनी उच्छाद मांडून ठेवला आहे. ऋषीमुनींना हवन करण्यास त्रास होतो आहे.” त्यानंतर यावर राजा दशरथाशी चर्चा झाल्यानंतर राम आणि लक्ष्मणास आपल्यासोबत घेऊन विश्वामित्र जंगलात आले.थोड्या अंतरावर गेले असता, रथ आणि सोबत आलेली सेना विश्वामित्रांनी परत माघारी पाठवली व ते म्हणाले, “या पुढची यात्रा आपण पायी करणार आहोत. रात्रीच्या वेळी जितकी व्यवस्था असेल, तितक्या व्यवस्थेतच झोपणे, जेवढे मिळेल तितकेच खाणे, यातून स्वत:मध्ये शक्ती निर्माण करणे, आत्मविश्वास निर्माण करणे, जंगलातील लोकांसोबत त्यांच्याप्रमाणेच राहून त्यांचे नेतृत्व करणे, हे होणे स्वाभाविक होते. तिथल्या लोकांना मिळालेल्या उत्तम नेतृत्वामुळे सर्वांनी मिळून जंगलातील राक्षसी त्राटिका आणि रावणाच्या सेनेचा वध केला.
 
हे साहस, हे समर्पण आणि जनतेसोबत त्यांची असलेली एकात्मता यातून त्यांना एकूण परिस्थितीची जाणीव झाली. लोकांची गरिबी आणि वंचितता समजून आली. त्यातून असा संकल्प दिसून आला की, श्रीराम हे केवळ राजमहलासाठी जन्माला आलेले नसून ते समाज संघटित करण्यासाठी आले आहेत. समाजाला धार्मिक आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी, समाजात शौर्य प्रदान करण्यासाठी ते अवतरले आहेत. प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत पुन्हा आले, तेव्हा अयोध्यानगरी आनंदात न्हाऊन निघाली होती. परंतु, त्यात एक चिंताही होती की, प्रभू श्रीराम राजा बनून अयोध्येत अडकून तर जाणार नाही ना? ते समाजात जनतेच्या भेटी घेतील का? ते सामान्य लोकांशी नाते नाही जोडू शकणार का? त्यावर एकमात्र उपाय होता - श्रीरामांचा वनवास. मात्र, श्रीरामांनी वनवासात जाण्याच्या निर्णयाशी कोणी सहमत नव्हते. मुळात दशरथ राजाही यास सहमत नव्हते.” राजा दशरथ म्हणाले, ‘’श्रीरामा, तू मला कैद करून घे, मला बंदिवासात ठेव, असे केले तर माझे वचन मोडणार नाही आणि मी तुला राजा म्हणूनही पाहू शकेन.” हे जरी स्वतः राजा दशरथ म्हणाले असले तरी श्रीरामांनी ते स्वीकारले नाही. त्यांनी आपल्या आईच्या इच्छेलाच आज्ञा म्हणून स्वीकारले. पत्नी सीता व भाऊ लक्ष्मणासह वनवासाला निघाले. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनीसुद्धा जंगलातील अनवाणी प्रवास सुरू केला.
 
कोणत्याही कथेत, कोणत्याही नाटकात नायक असतो. त्याचप्रमाणे खलनायकही असतो. खलनायक जे म्हणतो तो पुस्तकाचा संदेश नसतो. जे नायक सांगतो तो मुख्यतः पुस्तकाचा संदेश असतो. तुलसीदास लिखित विनय पत्रिकेत एक प्रसंग आहे की, श्रीराम विराजमान आहेत आणि जनता त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या पाया पडून त्यांना वंदन करत आहेत. श्रीराम वरदमुद्रेत त्यांना आशीर्वाद देत आहेत. तेव्हा त्यांना आपले मित्र केवट राजा दुरून येताना दिसले. त्यांना पाहून राम उभे राहिले आणि मिठी मारण्याच्या उद्देशाने त्यांनी हात लांब केले. परंतु, केवट राजा जागेवरच थांबले. कारण, आपल्या जातीला छोटे लेखून केवट राजा श्रीरामांची गळाभेट घेण्यासाठी संकोच करत होते. त्यावर रामाने उत्तर दिले, ‘’केवट राजा, मी लहान किंवा मोठ्या जाती मानत नाही, मी केवळ प्रेमाची नाती मानतो.” असे म्हणत श्रीराम स्वतः पुढे झाले आणि केवट राजाला मिठी मारली. त्याप्रसंगी दोघांचेही डोळे पाणावले होते. श्रीरामाच्या जीवनाचा, तसेच रामायणाचा हा खरा संदेश आहे.
 
ज्यावेळी सीतामातेला रावण लंकेत घेऊन गेला, तेव्हा तिच्या शोधाकरिता श्रीरामांना वानरसेनेची मोठी मदत झाली. त्यावेळी रामाने केवळ सुग्रीव किंवा प्रमुख वानरांशी संबंध नाही जोडले, तर अगणित अशा वानरसेनेतील प्रत्येकाची त्यांनी विचारपूस केली. एकही वानर असा सुटला नसेल, ज्याची खुशाली श्रीरामांना माहिती असेल. कोणासाठी वेगळे विशेषाधिकार नव्हते, तर सामूहिक प्रेमाचे दर्शन याठिकाणी घडताना दिसत होते. शबरीच्या भेटीदरम्यानही असाच एक प्रसंग दिसून आला. शबरीच्या कुटीजवळ श्रीराम गेले असता, शबरीने त्यांचे स्वागत केले, त्यांना अल्पोपहार सादर केला. अल्पोपहारात बोरं होती. आंबट बोरं श्रीरामांना येऊ नये म्हणून शबरी प्रत्येक बोर चाखून श्रीरामांना देत होती. राम केवळ शबरीमधल्या प्रेमत्वाच्या भावनेकडे पाहात होते. कुठलाही संकोच न करता ते बोरं खात होते. आपल्या जातीचा, आपल्या परिस्थितीचा उल्लेख करत शबरीने श्रीरामाशी वार्तालाप केला. तेव्हा रामाने शबरीला आपल्या आईसमान लेखून भक्ती किती प्रकारची असते, याबाबत सांगितले आणि ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.
 
रावणाविरोधात युद्ध लढण्यासाठी श्रीरामांनी जी सेना तयार केली, त्यात अयोध्या किंवा जनकपुरीमधील कुशल सैन्य नव्हते, तर यात स्थानीय समाजातील अशी लोकं ज्यांना वंचित ठेवण्यात आले, अशांना संघटित करून त्यांना शस्त्रविद्या शिकवून बलशाली केले. त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. समाजात राहून समाजात सामर्थ्य तयार करण्याचे काम त्यांनी केले. समाजातील लोकांमध्ये त्यांनी विश्वास जागृत केला. त्यांची सेना बनवली. रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामाच्या दिशेने येत होता. तेव्हा श्रीरामाकडे शरण आलेल्या विभीषणाचे सर्वांनी स्वागत केले. चर्चा झाल्यानंतर सर्वांनी विभीषणाचा स्वीकार केला आणि सर्वानुमते त्यांना राजा म्हणून घोषित केले. श्रीरामांनी तयार केलेली वानरसेना केवळ रावणाचा वध करायचा, या हेतूने संघटित केली नव्हती. वानरसेनेतील प्रत्येकाशी त्यांनी एक नातं तयार केलं होतं, ते केवळ आपल्या अजेंड्याविषयी नाही बोलायचे, तर आपल्या सुख-दुःखाचे क्षण ते यांसोबत बोलायचे. त्या सर्वांमध्ये अनौपचारिकता तयार झाली होती.
 
समाजात एकप्रकारे धर्म आणि आर्य भावनेची जाणीव आणि संचार जागृत झाला होता. जेव्हा आपण वर्तमानात प्रभू श्रीरामाचे स्मरण करतो, तेव्हा नक्कीच प्रश्न पडतो की, आपल्या सर्वांच्या मनात श्रीराम आहेत की नाही? आणि जर प्रत्येकाच्या हृदयात राम असेल, तर कोणी लहान किंवा मोठा असू शकतो का?एकदा संत रविदासजींच्या स्वप्नात श्रीराम आले होते. रविदास यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की, त्यांना लहान (निम्न वर्गीय) का बनवले? ’‘मी चामड्याचे काम करतो, म्हणूनच मी लहान आहे.” यावर राम खूप हसले आणि म्हणाले, “तुम्ही चामड्याचे जास्त काम करता की मी? मनुष्य, स्त्री, गाय, म्हशीच्या रुपात तुम्ही चांबड्याच्या वस्तू बनवता आणि पृथ्वीतलावर विकता. मग चामड्याचे काम करून कोणी लहान झाले, तर तुम्ही लहान कसे झालात?” त्यावर रविदास म्हणाले, “मग पंडित मला मंदिरात का येऊ देत नाही?” त्यावर रामाने छान उत्तर दिलं. ते म्हणाले, “ज्या मंदिरात पंडित तुम्हाला येऊ देत नाही, तिथे मी राहत नाही. ते त्या पंडिताचे दुकान आहे.” केवळ रामानेच नाही, तर प्रत्येक भगवंताने हा संदेश दिला आहे. धर्म हा भेदभावाशी संमत नाही, तर धर्म एकात्मतेशी, समानतेशी, समरसतेशी संमत आहे. याला समजून भारतातील समाजाने आपल्यातील दोष दूर करण्याचा निरंतर प्रयत्न केले. इतकेच नव्हे, तर समाजाने आपल्यातील भेदभावाची भिंत पाडण्यासाठीसुद्धा निरंतर प्रयत्न केले.
 
हे प्रयत्न आजही चालत आहेत, मात्र ते पूर्ण व्हायला हवेत. श्रीरामांचे भक्त विभाजित होऊन नाही राहू शकत नाही, तर ते समरस होऊन राहू शकतात. विश्व हिंदू परिषदेने १९६९च्या संमेलनातच ’हम सब हिंदू एक हैं’ हा संदेश समाजाला देऊन सर्वांना संघटित केले. आजही ज्यांना ‘अनुसूचित जाती’ म्हणून संबोधले जाते, ते आर्थिक, शैक्षणिक, कौशल्य विकासदृष्ट्या मागे पडले असल्याचे दिसते. ते दूर करण्याची आज आवश्यकता आहे. सर्वांना बरोबरीने घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडावी लागेल. सर्वांना मिळून ही भेदभावाची भिंत पाडायची आहे. तेव्हाच खर्‍याअर्थाने देशात रामराज्य येईल. आपण असे समन्वित, समर्पित, प्रगत आणि समृद्ध रामराज्य निर्माण करू, स्थापन करू, जिथे प्रत्येकजण सुखी, संपन्न, सुशिक्षित, साधनसंपन्न, धर्मानुसार जगणारा असेल आणि त्यात यशस्वी होईल. मला असे वाटते की, रामनवमी हा संकल्प पूर्ण करण्याचा दिवस आहे.

आलोक कुमार
(लेखक विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121