शिवसेना कुणाची? ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    16-Apr-2024
Total Views |

Shinde & Thackeray 
 
मुंबई : शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत येत्या ६ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला सर्वात मोठा धोका : आदित्य ठाकरे
 
एकनाथ शिंदे ४० आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील झाल्याने शिवसेनेत फूट पडली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. तसेच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनीसुद्धा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर येत्या ६ मे रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.