भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14-Apr-2024
Total Views | 61
नागपूर : भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. त्यांनी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेबर आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला. या देशात समतेचं राज्य स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होत आहे."
ते पुढे म्हणाले की, " आज भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. स्वत: पंतप्रधानदेखील हेच म्हणतात की, कुठल्याही ग्रंथापेक्षा मला भारताचं संविधान जास्त महत्वाचं आहे. या संविधानामुळे आज भारत प्रगतीकडे जात आहे," असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असून सर्वच पक्ष आपापल्या प्रचाराला लागले आहे. याशिवाय आपापल्या मतदारसंघात भेटीगाठीही सुरु आहेत. दरम्यान, यावेळी राज्यात महायूती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.