"सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून...;" बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    13-Apr-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray & Sonia Gandhi
 
मुंबई : उद्धव ठाकरे सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून तुम्ही तुमच्या नाण्याची गारगोटी करून घेतली, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर फक्त माझं नाणं चालणार अशी दर्पोक्ती आणि अहंकाराची भाषा उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंचं नाणं खोटं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात बघितलं. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल‘ ठरवून टाकलं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  राज ठाकरेंचा राऊतांना खोचक टोला, म्हणाले, "कावीळ झालेल्यांना..."
 
ते पुढे म्हणाले की, "खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या कष्टानं शिवसेनेच्या नाण्याला सुवर्ण झळाळी मिळवून दिली. पण तुम्ही सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून तुमच्या नाण्याची गारगोटी करून घेतली. बाकी कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला. यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला ‘मोदी की गॅरंटी‘ या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता. देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही ‘मोदी की गॅरंटी‘च चालणार," असेही ते म्हणाले.