मुंबई: गेल्या तीन वर्षांत डिव्हाईसमधील डेटा चोरीत ६०० टक्क्याने वाढ झाली असल्याचे कॅस्परस्की या सायबर सिक्युरिटी कंपनीने म्हटले आहे.कंपनीने आपल्या डिजिटल फूटप्रिंट इंटेलिजन्समध्ये माहिती दिल्यानुसार खाजगी व कार्यालयीन इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमधील डेटा चोरण्याचे प्रकार वाढले असल्याचे सांगितले आहे.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या प्रकाराची संख्या १० दशलक्षावर पोहोचली आहे.
गेल्या तीन वर्षात ही संख्या ६४३ टक्क्यांनी वाढल्याचे कॅस्परस्कीने म्हटले आहे. कंपनीच्या निरिक्षणानुसार ,२०२३ मध्ये गैरप्रकार व डेटाचोरीतील प्रकरणाची संख्या १६०००००० वर पोहोचली आहे. ग्राहक व व्यवसायासाठी हे डेटा चोरीचे प्रमाण वाढले असून ग्राहक व व्यवसायासाठी ही बाब चिंताजनक असल्याचे यात म्हटले आहे.
सायबर क्राईम मध्ये सरासरी ५०.९ लोकांचे लॉग इन क्रेडिएनशियल व माहिती धोक्यात आल्याचे या निरिक्षणात म्हटले आहे. याशिवाय सोशल मिडियावरील माहिती, खाजगी माहिती, बँकिंग सेवांची गोपनीय माहिती, क्रिप्टोग्राफी, ईमेल व इतर सेवांची माहिती धोक्यात आल्याचे यामध्ये म्हटले गेले आहे.
या निरिक्षणातील आकड्यांहून अधिक लोकांचे आयडी पासवर्ड धोक्यात आल्याची शक्यता असल्याचेही यात म्हटले आहे. या डेटातील माहितीनुसार ४४३००० वेबसाईटचे क्रेडेनशियलची माहिती लीक झाल्याची शक्यता आहे. यामध्ये .com , .co, .vn , .in या संकेतस्थळाचा देखील समावेश आहे.यातील भारतामध्ये .in मधील सुमारे ८ दशलक्ष लोकांच्या माहितीची चोरी झाल्याची नोंदणी या निरीक्षणात नोंदवली गेली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना,"लॉगिन क्रेडेन्शियल्ससह लॉग फायलींचे डार्क-वेब मूल्य डेटाच्या अपीलवर आणि तेथे विक्री करण्याच्या पद्धतीनुसार बदलते. क्रेडेन्शियल नियमित अपलोडसह सदस्यता सेवेद्वारे विकले जाऊ शकतात,विशिष्ट विनंत्यांसाठी तथाकथित 'एग्रीगेटर', किंवा 'शॉप' नुकतेच विकत घेतलेले लॉगिन क्रेडेन्शियल्स केवळ निवडक खरेदीदारांना या दुकानांमध्ये प्रति लॉग फाइल USD 10 पासून सुरू होतात," असे कॅस्परस्की डिजिटल फूटप्रिंट इंटेलिजन्सचे सायबर सुरक्षा तज्ज्ञ सेर्गे शेरबेल म्हणाले आहेत.