मालवण - विहीरीत पडलेल्या कोळसुद्यांचा बचाव; किनारपट्टी भागात वाढता वावर

    12-Apr-2024
Total Views | 184
wild dog rescue


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधून विहीरीत पडलेल्या रानकुत्र्यांचा वन विभागाने बचाव केला (wild dog rescue). गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी चिंदर गावामध्ये दोन रानकुत्रे विहीरीत पडल्याचे आढळले होते (wild dog rescue). कोकणातील किनारपट्टीभागात रानकुत्र्यांचा वाढता वावर आणि अधिवास हा अधोरेखित करण्यासारखा आहे. (wild dog rescue)

मालवण तालुक्यातील मौजे चिंदर बाजार वाडी येथे महेंद्र मांजरेकर यांच्या विहिरीत गुरुवार सायंकाळी दोन वन्यजीव पडल्याचे आढळले. सुरुवातीस ते कोल्हे वाटले. मांजरेकर यांनी यासंबंधीची माहिती गावचे पोलीस पाटील दिनेश पाताडे यांना दिली. पोलीस पाटलांनी वन विभागाला कळवल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच विहीरीत पिंजरा सोडला आणि वन्यजीवांना बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर हे जीव कोल्हे नसून रानकुत्रे असल्याचे निदर्शनास आले. हे दोन्ही रानकुत्रे अल्पवयीन होते. कुडाळचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर यांच्याकडून रानकुत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही जीवांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक शरद कांबळे, वनसेवक अनिल परब, वाहनचालक राहुल मयेकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, ग्रामस्थ विक्रांत आचरेकर धनंजय कांबळी, ओंकार वळणजू, राजू पडवळ, मुन्ना पडवळ या सर्वांनी मिळून पार पाडले.

कोकणात रानकुत्र्यांना विविध नावांनी ओळखले जाते. काळसुंदे, कोळशिंदे, देवाचे कुत्रे अशा बऱ्याचा नावांचा त्यात समावेश आहे. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये वावरणाऱ्या रानकुत्र्यांचे कोकणातील गावागावांमध्ये होणारे दर्शन आता गजालीचा विषय बनत आहेत. यापूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेली कोकणातील गावे या गजालीच्या केंद्रस्थानी होती. मात्र, आता अगदी किनारपट्टीच्या लगतच्या गावांमध्ये देखील रानकुत्र्यांविषयीच्या गप्पा ऐकायला मिळतात. कोकणातील काही गावांना आता बिबट्यासह रानकुत्र्यांच्या कळपाचा देखील पाहरा आहे. कोकणात शेतीला नुकसानदायी ठरणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत आहे. याच वाढत्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी रानकुत्र्यांची संख्या देखील वाढणे आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक मंडळी मांडत आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121