महाबळेश्वर - बेशिस्त पर्यटकांनी फेकला प्लास्टिकचा कचरा; गव्याने तो चघळून खाल्ला

    12-Apr-2024
Total Views | 400
gaur in mahabaleshwar ear plastic


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाबळेश्वरमध्ये बेशिस्त पर्यटकांकडून उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे (gaur in mahabaleshwar). याठिकाणी उघड्यावर पडलेल्या प्लास्टिकचा कचरा रानगवा खात असल्याचे छायाचित्र पुण्यातील वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले आहे (gaur in mahabaleshwar). त्यामुळे महाबळेश्वरमधील वन्यजीवांच्या अधिवासाला देखील प्लास्टिकचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. (gaur in mahabaleshwar)

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल मोठ्या संख्येने असते. त्यातही उन्हाळी सुट्टीमुळे महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांची रिघ लागली आहे. अशातच काही बेशिस्त पर्यटकांकडून उघड्यावर फेकला जाणारा प्लास्टिकचा कचरा वन्यजीवांच्या मुळावर उठत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वन्यजीव छायाचित्रकार वैजयंती गाडगीळ या गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी महाबळेश्वराला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आर्थर सीट पाॅईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवा दिसला. लागलीच त्यांनी कॅमेरा काढून त्याचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा गवा प्लास्टिक खात असल्याचे माझ्या निदर्शनास आल्याची माहिती गाडगीळ यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.

बेशिस्त पर्यटकांनी पदार्थ भरलेली प्लास्टिकची पिशवी रस्त्याच्या कडेला फेकून दिली होती. त्याठिकाणी आलेल्या गव्याने प्लास्टिकच्या पिशवीसकट तो पदार्थ खाल्याचे निरीक्षण गाडगीळ यांनी नोंदवले. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांकडून उघड्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या घटनेमधून पर्यटकांना बोध घेणे गरजेचे आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121