मैत्री करण्यास नकार दिल्यामुळे महिलेवर ॲसिड अटॅक; 'अमन' बनलेला 'रहमान' पोलिसांच्या ताब्यात

    11-Apr-2024
Total Views | 89
 ACID
 
डेहराडून : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये मंगळवार, दि.९ एप्रिल २०२४ एका विवाहित महिलेला मैत्री न केल्यास तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देण्यात आली. रहमान नावाच्या तरुणाने ही धमकी दिली आहे. तसेच महिलेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. रहमानने पीडितेला अमन अशी ओळख दिली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना डेहराडूनमधील दलनवाला पोलीस स्टेशन परिसरात घडली. दि. २८ मार्च २०२४ रोजी येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेला तिच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये फक्त 'हॅलो' असे लिहिले होते. परिचय विचारल्यावर, संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख दुबईतील एका रेस्टॉरंटचा मालक अमन म्हणून दिली. अमनने शेजारच्या मुलाकडून महिलेचा मोबाईल क्रमांक घेतल्याचे सांगितले.
 
 
अमनने महिलेला सांगितले की, तो सध्या दुबईहून डेहराडूनला आला आहे. यानंतर स्वत:ला अमन म्हणवून घेणाऱ्या तरुणाने महिलेवर मैत्रीसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, महिलेने हा प्रस्ताव फेटाळला. पीडितेच्या नकाराचा आरोपीवर काहीही परिणाम झाला नाही. काही दिवसांनी त्याने पीडितेवर बोलण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि तू नाही बोललीस तर हाताची नस कापून घेईल, अशी धमकी दिली.
 
अमन असे बनावट नाव धारण केलेल्या रहमानने त्याचे लोकेशन पाठवले आणि पीडितेला भेटण्यास सांगितले. शेवटी नाराज होऊन पीडितेने पतीला सर्व प्रकार सांगितला. आरोपीला पोलिसांनी पकडण्यासाठी महिला आणि तिच्या पतीने कट रचला. महिला आरोपीने पाठवलेल्या ठिकाणी पोहोचली. थोड्याच अंतरावर तिचा नवराही गाडीत बसून निरीक्षण करू लागला.
 
 
काही वेळाने अमन दुचाकीवरून तेथे पोहोचला. त्याने आपले खरे नाव रेहमान असल्याचे सांगितले. त्याने पीडितेला सोबत नेण्यासाठी त्याच्या दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न सुरू केला. महिलेने नकार दिल्यावर रेहमानने खिशातून एक छोटी बाटली काढली आणि ती ॲसिड असल्याचे सांगितले. तो म्हणाला की तू माझे ऐकले नाहीस तर तुझ्या तोंडावर अॅलसिड टाकेल. महिलेचा पती तेथे पोहोचल्यावर रेहमानने त्याच्याशीही भांडण सुरू केले.
 
रहमानने पती-पत्नी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या वादामुळे आजूबाजूला लोकांची गर्दी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळ गाठून रेहमानला ताब्यात घेतले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रहमानविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. इन्स्पेक्टर दलनवाला राकेश गुसैन यांनी माध्यमांशी बोलताना या कारवाईला दुजोरा दिला आहे. रहमान हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा आहे. डेहराडूनच्या सहस्रधारा रोडवर भाड्याच्या घरात राहून तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121