नवी दिल्ली : कॅनडाच्या सरकारी मीडियाने निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता कॅनेडियन सरकारकडून सदर आरोपांची चौकशी करण्यात आली असून तपासाअंती भारताने कॅनडाच्या अंतर्गत बाबींमध्ये रस दाखविला नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
China interfered in 2 Canadian elections, both of which were won by Trudeau. Remember India was accused of election interference. It was China all along. Another article says, China had transferred $250,000 in 2019 to Canada for foreign interference opshttps://t.co/OCjGS9oL86
दरम्यान, आरोपांच्या तपासात चीनचे नाव समोर आले असून २०१९ व २०२१ च्या कॅनडाच्या निवडणुकीत चीनने हस्तक्षेप केला असून भरपूर पैसाही खर्च केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक निवडणुकीत चीनी वंशाच्या लोकांवर ट्रुडोंच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबावदेखील टाकण्यात आला होता. कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने तपास केला असता देशातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप केल्याचे आढळून आले आहे.
कॅनडाच्या सरकारी मीडिया सीबीसीने कॅनडाच्या सुरक्षा गुप्तचर संस्थेने दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी २०१९ आणि २०२१ मध्ये कॅनडाच्या फेडरल निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून कॅनडाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांच्या अधिकृत तपासात हा हस्तक्षेप करणारा देश भारत नसून चीन असल्याचे समोर आले आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप केल्याचे कॅनडाच्या गुप्तचर संस्थेला आढळून आले.
दरम्यान, २०१९ आणि २०२१ च्या ज्या निवडणुकांवर चर्चा होत आहे, त्यात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीने बाजी मारली होती. या निवडणुकीत चीनच्या भूमिकेचे वृत्त आल्यापासून कॅनडातील विरोधक संतप्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर नाराज असलेल्या विरोधी पक्षांच्या मागणीनंतर ट्रूडो यांनी परदेशी हस्तक्षेपाची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन केला आहे.