वडोदरा 'बीफ समोसा' प्रकरण; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई!

    10-Apr-2024
Total Views | 268

Beef Samosa Vadodara

मुंबई (प्रतिनिधी) :
गुजरात पोलिसांनी वडोदरा येथील 'हुसेनी समोसा सेंटर' वर काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. गोमांस असलेले समोसे (Beef Samosa) विकल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ सहा आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान इम्रान युसूफ कुरेशी हा समोशासाठी त्यांना गोमांस पुरवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी इम्रानला सोमवार, दि. ८ एप्रिल रोजी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. छापेमारीदरम्यान ताब्यात घेतलेल्या मालक युसूफ आणि नईम शेख यांच्यासह सहा जणांना शनिवारी अटक करण्यात आली होती.

एफएसएलच्या अहवालानुसार पोलिसांनी छापेमारीत ६१ किलो तयार समोसे आणि ४९ हजार रुपये किमतीची उपकरणे जप्त केली आहेत. गोहत्या विरोधी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित, गुजरात प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक २०१७ च्या कलम ८ आणि १० अंतर्गत सात आरोपींविरोधात आरोप करण्यात आले आहेत. हे आरोपी शहरातील लोकांना रेडी टू फ्राय समोसे आणि रेडी टू इट समोसे विकायचे. वडोदरा येथील कसाईच्या दुकानात काम करत असताना आरोपी इम्रानने इतर आरोपींना भेटल्यानंतर गोमांसयुक्त समोसे पुरवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तो या अवैध व्यवसायासाठी भालेज येथे स्थलांतरित झाला.

हे वाचलंत का? : माओवाद्यांनी बंद केलेल्या राम मंदिराचे दार दोन दशकांनंतर उघडले

एका स्थानिक प्राणी कार्यकर्तीने संपूर्ण प्रकार पोलिकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी चिपवाड भागातील या दुकानावर छापा टाकला. ‘हुसैनी समोसा’ पुरवठादारांकडून पोलिसांनी एकूण ११३ किलो गोमांस आणि १५२ किलो भरलेले समोसे जप्त केले. दुकान मालक युसूफ आणि नईम शेख तसेच कर्मचारी हनीफ भथियारा, दिलावर पठाण, मोईन हबदल आणि मोबीन शेख या सहा आरोपींसह गोमांस पुरवठादार इम्रान कुरेशी या सातव्या आरोपीलाही सध्या अटक करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121