मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठी झळाळी आली आहे. कालची मरगळ झटकून बाजारात नवी सकारात्मकता अखेरच्या सत्रात दिसून आली आहे.सेन्सेक्स निर्देशांक ३५४.४५ अंशाने उसळी घेत ७५०३८.१५ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १११.०५ अंशाने वाढत २२७५३.८० पातळीवर स्थिरावला आहे.आज दोन्ही बँक निर्देशांकातही झळाळी प्राप्त झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३६३.९८ अंशाने वाढत ५५३८७.८८ पातळीवर स्थिरावला तर निफ्टी बँक निर्देशांकात २५६.०५ अंशाने वाढ होत ४८९८६.६० पातळीवर निफ्टी पोहोचला आहे.
बीएसई (BSE) मिडकॅपमध्ये आज ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसई (NSE) वर मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये १.११ टक्क्याने व ०.८५ टक्क्यांने अनुक्रमे वाढ झाली आहे. बीएसईतील निर्देशांक आज ' हिरवे ' राहिले असून निफ्टीतील क्षेत्रीय निर्देशांकात फार्मा व ऑटो निर्देशांक वगळता सगळे निर्देशांकात आज वाढले आहेत.
सर्वाधिक वाढ आज मिडिया समभागात (१.८०%) झाले असून त्यानंतर तेल गॅस (१.५० %) , पीएसयु बँक (१.५३ %) खाजगी बँक (०.४८%) र रिअल्टी (०.५९ %) हेल्थकेअर (०.०७%) मेटल (१.१८%) कनज्यूमर ड्युरेबल्स (०.६८%) इतके वाढले आहेत. गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान फार्मा (०.३४%) व निफ्टी ऑटो (०.०६%) निर्देशांकात झाले आहे.
आज बीएसईतील एकूण कंपन्याचे बाजारी भांडवल (Market Capitalisation) ४.८३ ट्रिलियन डॉलर इतके राहिले असून एनएसईवरील कंपन्याचे एकूण कंपन्याचे बाजारी भांडवल ३९९.१० लाख कोटी इतके राहिले आहे.आज अखेरच्या सत्रात भारतीय रुपया प्रति डॉलर ८३.२३ रुपयांना बंद झाला आहे. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १७ पैशाने वधारला होता.सोमवारी रुपयांत कोणतीही हालचाल दिसली नसल्याने ८३.३१ रुपयांवर डॉलर स्थिरावला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड तेलाच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. दोन दिवस इस्त्रायली सैन्याने गाझा पट्टीतील अतिरिक्त सैन्य काढल्याने काही काळासाठी भाव घसरले होते. परंतु सीझफायरचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत क्रूड (कच्च्या) तेलाच्या भावात ०.४५ टक्क्यांनी वाढ होत WTI फ्युचर क्रूड निर्देशांक ८५.६२ पातळीवर पोहोचले आहेत तर ब्रेंट क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.४८ टक्क्यांनी वाढ झाली असून ब्रेंट क्रूड निर्देशांक ८९.८४ पातळीवर पोहोचले आहेत.
भारतात एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) मध्ये क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रति बॅरेल तेलाचे दर ७११३ रुपयांवर पोहोचले आहेत. नॅचरल गॅस निर्देशांकातही २.८४ टक्क्यांनी वाढ होत १५९.५० पातळीवर गॅस निर्देशांक पोहोचला आहे. युएसमध्ये आज सीपीआयचे (Consumer Price Index) चे मार्चमधील आकडे येणार असल्याने फैडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात बदल होऊ शकतो का याबद्दल पुढील दिशा ठरू शकते.
अमेरिकन बाजारातील DoW वगळता S & P 500, NASDAQ हे शेअर बाजार तेजीत राहिले होते तर युरोपातील FTSE 100, DAX, CAC 100 या तिन्ही शेअर बाजार वधारले आहेत. भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण असले तरी NIKKEI व SHANGHAI बाजारात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. तर HANG SENG बाजारात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र प्रतिसाद असताना देखील भारतीय बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. सकाळच्या सत्रात पहिल्यांदा ७५००० चा सेन्सेक्समधील टप्पा पार पडला होता. लोकसभेच्या निवडणूका पूर्व काळात कंपन्याचे चांगले प्रदर्शन तिमाहीतील चांगले अंक व भविष्यात रेपो दरात कपात होण्याची शक्यता यामुळे आज सकारात्मक पातळीवर बाजार बंद झाले आहे. आज देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकीत मोठी वाढ झाली आहे.
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंटने म्हटले, 'मजबूत जागतिक संकेतांमुळे भारतीय इक्विटी मार्केट गॅप अप नोटवर उघडले. निफ्टीने २२७७५.७० चा सार्वकालिक उच्चांक गाठला; तथापि, सेन्सेक्स सकारात्मक राहिला परंतु सर्वकालीन उच्चांक पार करू शकला नाही. शेवटी, निफ्टी ०.४९ % च्या वाढीसह २२७५४ वर सकारात्मक नोटवर स्थिरावला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांच्या नेतृत्वात वाढीसह, व्यापक निर्देशांक सकारात्मकतेने संपले.
मिडिया,ऑइल अँड गॅस,मेटल,एफएमसीजी,पीएसयू बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये खरेदीचे रस दिसून आले, तर फार्मा क्षेत्र दबावाखाली राहिले.तांत्रिक दृष्टिकोनातून, निर्देशांकाने २२५०० पातळीच्या आसपास चांगला आधार तयार केला आहे. जोपर्यंत निर्देशांकाला २२५०० चा सपोर्ट आहे, तोपर्यंत सध्याची रॅली २३००० पातळीपर्यंत चालू राहू शकते. निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी २२६२० आणि २२५०० स्तरांवर अस्तित्वात आहेत, तर प्रतिरोध २२९००आणि २३००० स्तरांवर आहे.
दरम्यान, निफ्टी बँक निर्देशांकाने आज ४९०५७.४० वर नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला आणि दिवस ४८९१८च्या आसपास सकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, बँक निफ्टीने मागील सर्वकालीन उच्चांक ओलांडला आहे आणि ४८६४० च्या वर टिकून आहे. अशा प्रकारे, जोपर्यंत निर्देशांक ४८६४०च्या वर आहे तोपर्यंत रॅली ४९५००-५०००० च्या पातळीवर वाढू शकते. बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४८८००आणि ४८६४० वर दिसत आहेत, ४९५०० आणि ५०००० वर प्रतिकार पातळी आहेत.'
आजच्या शेअर बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आज निफ्टी ०.४९% ने २२७५३ वर ग्रीन नोट वर बंद झाला, तर सेन्सेक्स ०.४७ % ने ७५०३८ वर बंद झाला. निफ्टी मीडिया आणिपीएसयू बँक हे क्षेत्र होते ज्यांनी आज अनुक्रमे १.८०% आणि १.५३ % ने वाढ केली आहे.यूएस सीपीआय चलनवाढ डेटाच्या आधी गुंतवणूकदारांनी सावध दृष्टिकोन स्वीकारला होता.
ज्याचा भविष्यातील फेड दर घटण्यावर प्रभाव पडू शकतो.निफ्टीमध्ये कोल इंडिया, बीपीसीएल, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज यांचा सर्वाधिक फायदा झाला, तर सिप्ला, मारुती सुझुकी, एचडीएफसी लाइफ, डिव्हिस लॅब्स आणि श्रीराम फायनान्स यांचा तोटा झाला.'
आजच्या बाजारावर भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च एनालिस्ट विनोद नायर म्हणाले 'आशियाई आणि युरोपियन समकक्षांपेक्षा किंचित मागे असूनही, व्यापक बाजारपेठेतील मजबूत कामगिरीमुळे भारतीय बाजारांनी त्यांची वरची गती कायम ठेवली. FOMC मिनिटांच्या येऊ घातलेल्या रिलीझवर आणि आज नंतरच्या यूएस चलनवाढीच्या डेटावर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित आहे.
प्रकाशनानंतर मजबूत यूएस जॉब डेटामुळे, बाजारातील भावना स्पाइक चलनवाढीच्या अपेक्षेकडे झुकतात, ज्यामुळे नजीकच्या कालावधीत दर कपातीची शक्यता कमी होते. याशिवाय, फिचने चीनच्या क्रेडिट रेटिंगची अलीकडील अवनती जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये संभाव्यपणे पुनरावृत्ती करू शकते, एक सावधगिरीची हमी देते. "
बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाला शहा म्हणाले, 'बँक निफ्टी निर्देशांक उन्नत स्तरावर एकत्रीकरण मोडमध्ये राहिला, ४९००० च्या वर बंद होण्यास धडपडत आहे. तात्काळ समर्थन ४८५०० वर आहे, ४९०००वर प्रतिकार आहे. यापातळीच्या पलीकडे कोणतीही निर्णायक हालचाल ट्रेंडिंग हालचालींना चालना देईल. इंडेक्स खरेदी राखतो. ऑन-डिप स्टॅन्स, ४८५०० कोणत्याही मंदीचा सामना करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण समर्थन स्तर म्हणून काम करत आहे."
आजच्या वाढलेल्या निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,' निफ्टी आज बहुतेक बाजूला राहिला कारण गुंतवणूकदारांनी यूएस सीपीआय महागाई डेटाच्या पुढे वाट पाहणे पसंत केले, ज्यामुळे फेडद्वारे दर कपातीवर परिणाम होऊ शकतो. प्रतिकार क्षेत्र २२७०० -२२७५० वर ठेवलेला आहे, तर समर्थन २२६०० वर आहे.वरील एक निर्णायक चाल २२७५० अल्पावधीत २३००० च्या दिशेने रॅली प्रवृत्त करू शकतात.बाजार श्रेणीबद्ध असल्याचे दिसत असल्याने, घसरणीवर खरेदी करणे आणि रॅलीवर विक्री करणे हे योग्य स्टॉप-लॉस उपायांसह चांगले धोरण सिद्ध होऊ शकते.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी टेक्निकल रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'प्रचलित ट्रेंडच्या सातत्य राखून बाजार अधिक वाढले आणि जवळपास अर्धा टक्का वाढले. सुरुवातीच्या गॅप-अप मूव्हनंतर, निफ्टी बहुतेक सत्रासाठी श्रेणीबद्ध राहिला आणि शेवटी २२७५३.८० स्तरांवर स्थिरावला. दरम्यान, बहुसंख्य क्षेत्र या हालचालींशी जुळले होते ज्यात FMCG, धातू आणि ऊर्जा सर्वाधिक लाभदायक होते. व्यापक निर्देशांक देखील दोन दिवसांच्या विरामानंतर उंचावले आणि ०.७% ते ०.९% च्या श्रेणीत वाढले.
जागतिक आघाडीवर स्थिरतेसह विविध क्षेत्रांतील फिरत्या खरेदीमुळे निर्देशांक दर दिवसेंदिवस उंचावर जाण्यास मदत होत आहे. आम्ही पुढे निफ्टीमधील २२८५० -२३१०० झोनकडे लक्ष देत आहोत आणि अपेक्षा करतो की २२३५०-२२५००झोन कोणताही नफा घेण्याच्या बाबतीत मजबूत आधार म्हणून काम करेल. कमाईच्या हंगामाच्या सुरुवातीमुळे स्टॉक-विशिष्ट अस्थिरतेला चालना मिळेल त्यामुळे सहभागींनी त्यानुसार त्यांच्या स्थानांचे नियोजन केले पाहिजे.'