माझ्या अभिनयाचे वेगळेपण मांडण्याची मुभा देणारा ‘श्रीकांत’ चित्रपट – शरद केळकर

Total Views | 42
sharad kelkar  
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : अभिनेते शरद केळकर आजवर विविधांगी भूमिकांमधून आपले वेगळेपण जपत आले आहेत. आता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ही सत्य घटना बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी एक वेगळी पण अतिशय महत्वपुर्ण भूमिका निभावली असून श्रीकांत चित्रपट एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे या ‘महाएमटीबी’च्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणून माझं अभिनय कौशल्य अधिक उत्सुफूर्त पद्धतीने मांडणारा हा चित्रपट आहे असे शरद केळकर (Sharad Kelkar) म्हणाले.
 
बऱ्याचदा माझ्याबाबतीत भारदस्त आवाज, संवाद फेकीतील एक पकड यामुळे साधर्म्य असणाऱ्या भूमिकाच अनेकदा माझ्या वाटेला येतात. त्यामुळे माझ्याबद्दल लोकांचा समज हा ठराविक पठडीतील भूमिका करणारा कलाकार अशी समज झाली आहे. पण श्रीकांत सारखे चित्रपट जे आपल्या कथेतूनही वेगळेपण दाखवू पाहतात या चित्रपटांमुळेच मला माझे एक अभिनेता म्हणून अभिनयाचील वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कारण मला एक नट म्हणून माझ्यात अभिनयाचे किती नानाविध अंग आहेत हे दाखवण्यास आवडते आणि त्यासाठी अशा वेगळ्या कथानकाच्या आणि माझ्यासाठी वेगळ्या धाटणीच्या भूमिका फार महत्वाच्या ठरतात. कारण अभिनयातील तोच-तोचपणा मी करत राहिलो तर जरी लोकांना माझं काम आवडत असलं तरी माझ्या कामामुळे मी संतुष्टित नसेल हे तितकेच खरे आहे”, असे म्हणत अंध व्यक्तींचे जीवन, अडचणी मोठ्या पडद्यावर मांडणारा आणि एका असमान्य व्यक्तिने अंध बांधवांसाठी रोजगार कसा सुरु केला याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवणारा श्रीकांत चित्रपट महत्वाचा आहे असेही शरद केळकर यांनी म्हटले.
 
‘श्रीकांत’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता राजकुमार राव असून त्यांना शरद केळकर, ज्योतिका यांनी देखील साथ दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून टी-सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी यांनी निर्मिती केली आहे. श्रीकांत चित्रपट १० मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121