'एमआयएम'सोबत काँग्रेसची युती? मुस्लीम मतांचे विभाजन टाळण्यासाठी हैदराबाद ओवैसींना पाठिंबा

    10-Apr-2024
Total Views | 145
 Ovaishi
 
हैदराबाद : काँग्रेस पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही. अशी माहिती तेलंगणा काँग्रेसचे सरचिटणीस यांनी ही माहिती दिली आहे. मतांचे विभाजन रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना पाठिंबा देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेस नेते फिरोज खान यांनी अशा वेळी हे वक्तव्य केले आहे, जेव्हा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एआयएमआयएम प्रमुखांचा मार्ग कठीण असल्याचे बोलले जात आहे. भाजपने येथून माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे, ज्यांना त्यांचे समर्थक 'हिंदू सिंहिणी' म्हणतात. ओवेसींच्या विरोधात उमेदवार न देणारी काँग्रेस कधीकाळी त्यांना 'भाजपची बी-टीम' म्हणून संबोधत होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ओवैसींना 'मोदींचे मित्र' म्हणत आहेत.
 
 
टाइम्स नाऊशी बोलताना तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेस नेते मोहम्मद फिरोज खान यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, “हैदराबादमध्ये सिकंदराबाद आणि हैदराबाद या दोन लोकसभेच्या जागा आहेत. माझा मतदारसंघ सिकंदराबादमध्ये आहे, हैदराबाद नाही. ओवैसी हैदराबादमध्ये जिंकतील, कारण एमआयएम आणि काँग्रेस पक्षामध्ये जागांबाबत तडजोड झाली आहे, असदुद्दीन नक्कीच हैदराबाद जिंकतील. तेलंगणातील लोकसभेच्या १६ जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र हैदराबादच्या जागेबाबत मौन बाळगले आहे.
 
काँग्रेसने असदुद्दीन ओवैसी यांना पाठिंबा दिल्याच्या वृत्तावर हैदराबाद भाजपच्या उमेदवार कोम्पेला माधवी लता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “काँग्रेसची एआयएमआयएमसोबत युती आहे, पण भाजपची बी टीम असल्याचा दावा केला जात आहे. सीपीआय बंगालमधील इंडी आघाडीचा भाग आहे, परंतु केरळमध्ये नाही. दिल्लीत आपची युती आहे, पण पंजाबमध्ये नाही. काँग्रेसची अडचण अशी आहे की काय करायचे ते स्पष्ट नाही. काँग्रेसमुक्त भारत = प्रगतीशील भारत."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121