Crystal Intergrated Services IPO News -
मुंबई: शेअर बाजारातील कमाईसाठी गुंतवणूकदार सज्ज झाले आहेत. याचे कारण म्हणजे अजून एक कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. रिपोर्टनुसार क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेसचा (Crystal Integrated Services) चा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. १४ मार्चला कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) शेअर बाजारात दाखल होणार आहे. १४ ते १८ मार्चपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे.क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस कंपनी हेल्थकेअर,एज्युकेशन,पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन, रेल रोड,मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सुविधा पुरवणारी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी आहे.
या कंपनीने १७५ कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणायचे ठरवले आहे. याशिवाय ऑफर फॉर सेल १७.५ लाख समभाग (शेअर) संस्थापक (Promoter) यांनी विक्रीसाठी ठेवले आहेत. यांचे १०० टक्के भागभांडवल संस्थांकडे आहे. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या कंपनीचा आयपीओ पूर्वीची देये (थकबाकी), वर्किंग कँपिटल गरजेसाठी व तसेच भविष्यातील भांडवली खर्चासाठी करण्यात येणार आहे.
या कंपनीचे आर्थिक वर्ष २३ मध्ये महसूल (Revenue) उत्पन्न ७१०.९७ कोटी इतके असून कंपनीचा अर्निग बिफोर इंटरेस्ट टॅक्स डेप्रिसिएशन अमोरटायझेशन (EBITDA) ने ५४.५१ टक्के असून पीएटी (Profit After Tax) ३८.४१ कोटी इतका होता. मात्र कंपनीकडून अजून आयपीओबददलची माहिती स्पष्ट झाली आहे.