
मुंबई: बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत नव्या उच्चांकाला बिटकॉईन पोहोचले आहे. या उलथापालथीच्या काळात क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency)वरील विश्वास वृद्धींगत होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर बिटकॉईनमध्ये वाढलेली समाजमान्यता पाहता परदेशातही मोठ्या प्रमाणात बिटकॉईनमध्ये व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार व इथेरेयुम (Ethereum) मधील विकसितता यामुळे बाजारात यांचा परिणाम होत बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत त्यांचे मूल्य ७०००० डॉलरवर पोहोचला आहे.
इथेरेयुम हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमधील एक बिटकॉईनचा प्रकार असून यात डेटा व डिजिटल सुविधेसाठी देवाणघेवाण होते.याचा वापर बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच बाजारातील स्थितीत फायदा होत क्रिप्टोग्राफीमधील मुलभूत सुविधेत बदल घडणार असल्याचे सुतोवाच करण्यात येते. अमेरिकेतील अनावरण झालेल्या क्रिप्टोस्पॉट एक्सचेंजची महती यावाढीतून दिसून येत आहे
यामुळे क्रिप्टोग्राफीत चालना मिळत असून सतत वरखाली जाणारे बिटकॉईनमध्ये व क्रिप्टोत स्थिर गुंतवणूकीसाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल क्रिप्टो करन्सीसाठी वाढत असल्याचे चित्र जगभरात दिसत आहे.तरीदेखील क्रिप्टोमधील करन्सी ट्रेडिंगमधील चढ उतार पाहता भविष्यात हे चलन किती लाभदायक ठरेल हा मोठा प्रश्न तज्ञांनी विचारला आहे.बिटकॉईन हे क्रिप्टोमधील लोकप्रिय चलन आहे.याखेरीज युएसडी कॉईन, करडानो, सोलाना, इथेरेयुम अशी अनेक क्रिप्टोकरन्सी जगभरात व विशेषतः पाश्चिमात्य देशात प्रचलित आहेत.
सध्या यातील ११ क्रिप्टो चलनाला (Crypto Currency) ला मान्यता मिळाली असून त्यामुळे युएसमध्ये २.२ अब्ज डॉलरची उलाढाल आतापर्यंत झालेली आहे.