मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने विदेशी पाळीव वन्यजीवांचा ताबा आणि त्यांच्या प्रजननासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत (
exotic pet). 'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'च्या कलम ४९ एम अंतर्गत हे नियम तयार करण्यात आले आहेत (
exotic pet). त्यानुसार 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या क्षेणी ४ मध्ये 'सायटीस'अंतर्गत संरक्षित करण्यात आलेले प्राणी जर तुम्ही पाळत असाल, तर त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. (
exotic pet)
२०२३ साली 'वन्यजीव संरक्षण कायद्या'मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार 'सायटीस'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित करण्यात आलेल्या विदेशी वन्यजीवांचा समावेश हा कायद्याच्या श्रेणी ४ मध्ये करण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या 'आययूसीएन' या परिषदेने १९६३ साली 'सायटीस'ची स्थापना केली. वन्यप्राण्यांसह नैसर्गिक संपत्तीची आंतरराष्ट्रीय तस्करीमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका उद्भवू नये म्हणून खबरदारीच्या योजना निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले. १९७३ साली भारतासह ८० देशांनी 'सायटीस'चे वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात नियम मान्य करुन या परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. 'सायटीस'च्या नियमानुसार कोणत्याही संकटग्रस्ट विदेशी प्राण्याची तस्करी बंधनकारक आहे. त्यासाठी 'सायटीसी'मध्येही विविध श्रेणी तयार करण्यात आल्या असून त्यामधील प्रथम श्रेणीत संकटग्रस्त विदेश वन्यजीवांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी 'लिव्हिंग अॅनिमल स्पिसीज (रिपोर्टिग अॅण्ड रिजिस्ट्रेशन) रुल', 2024 हा नियम अधिसूचित केला. या नव्या नियमानुसार भारतातील ज्या व्यक्तीने अथवा संस्थेने 'सायटीस'च्या प्रथम श्रेणीत संरक्षित असलेले विदेशी प्राणी पाळले असतील, तर त्यांची नोंदणी करणे अनिर्वाय आहे. २८ फेब्रुवारी, २०२४ पासून पुढील ६ महिन्यांमध्ये ही नोंदणी करणे अनिवार्य आहे. परिवेश २.० पोर्टलद्वारे ही नोंदणी करता येतील. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत परिवेश पोर्टलच्या माध्यमातूनच संबंधित राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना देखील माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तसेच या विदेशी वन्यजीवांचे हस्तांतरण, त्यांना पिल्ल झाल्यास अथवा मृत्यू झाल्यास, त्याचीही नोंद परिवेश पोर्टलमध्ये करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियामामुळे विदेशी प्राण्यांचे हस्तांतरण आणि जन्म-मृत्यू यांची नोंद ठेवता येणार आहे.