मविआच्या बैठकीत काँग्रेसला दुय्यम स्थान? बैठकीतही सापत्न वागणूक

    06-Mar-2024
Total Views | 75

MVA meeting


मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात बैठक सुरु असून यात काँग्रेसला दुय्यम स्थान दिले असल्याचे समोर आले आहे. काही जागांवर महाविकास आघाडीत मतभेद असून या बैठकीत हा तिढा सोडवणार आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेदेखील या बैठकीत सहभागी झाले आहेत.
 
महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाला २३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काँग्रेसला १५ आणि शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसला मागे सारलं जात असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या जागांचे सुत्र अजूनही अधांतरीच असल्याचे बोलले जात आहे.
 
 
या बैठकीमध्ये शरद पवार केंद्रस्थानी तर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले असल्याचे दिसले. महाविकास आघाडीतील पक्षांच्या संख्याबळाचा विचार केला असता सध्या काँग्रेस पक्ष मोठा भाऊ मानला जात आहे. मात्र, त्याच काँग्रेसला जागा वाटपात दुसरे स्थान देण्यात आले आहे.
 
दुसरीकडे, ज्या उद्धव ठाकरेंकडे केवळ ५ खासदार शिल्लक आहेत, त्यांना २३ जागा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान दिले जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ही गोष्ट काँग्रेस हायकमांड कशाप्रकारे हाताळणार आहे हा देखील प्रश्न आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121