वाढलेल्या अडचणीनंतर आयआयएफएलला फेअरफॅक्सचा मदतीचा हात

तरतलेसाठी आयआयएफएलला २०० मिलियन डॉलरचा निधी देणार

    06-Mar-2024
Total Views | 37

IIFL Gold Loan
 
 
मुंबई: आयआयएफएल या विना बँकिंग अर्थ संस्थेला काल रिझर्व्ह बँकेने सोनेतारण कर्ज वितरण करण्यास बंदी घातली आहे. आयआयएफएलला सोबतच जेएमडब्लू फायनांशियल सर्विसेसला समभाग, बाँडवर कर्जास बंदी घातली होती. आरबीआयच्या  कठोर पवित्र्यानंतर आयआयएफएल फायनान्सच्या मदतीसाठी फेअरफॅक्स कंपनीने पुढाकार घेत चलन तरलतेसाठी (लिक्विडीटी) आयआयएफएलला २०० दशलक्ष डॉलर्सचा पुरवठा करणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
 
या माहितीनुसार, आयआयएफएलवरील सोनेतारण कर्जावरील रोखीमुळे कंपनीमधील चलन तरलतेत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. गुंतवणूकदार व कंपनीची आर्थिक वाटचाल अखंडित सुरू ठेवण्यासाठी फेअरफॅक्सने आयआयएफएएलला २०० मिलियन डॉलर निधीचा पुरवठा केला आहे.
 
याविषयी प्रतिक्रिया देताना ,'आम्ही आयआयएफएल ग्रुप ऑफ कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत आणि निर्मल जैन आणि आर वेंकटरामन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या मजबूत व्यवस्थापन संघावर आमचा पूर्ण विश्वास आणि विश्वास आहे,” फेअरफॅक्स इंडियाचे अध्यक्ष प्रेम वत्सा म्हणाले आहेत.
 
फेअरफॅक्स कंपनीचा आयआयएफएल कंपनीत १५ टक्के भागभांडवल अस्तित्वात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोन्याची शुद्धता व परिमाण व देऊ केलेली कर्जाची रक्कम यामध्ये तफावत असल्याचे स्पष्ट करत कंपनीला सोने तारण कर्ज देण्यास बंदी केली होती. आयआयएफएल विना बँक आर्थिक संस्था (एनबीएफसी) म्हणून देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर कंपनीचे समभागात (शेअर्समध्ये ) मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती.
 
आयआयएफएलचे एकूण गोल्ड अंडर मॅनेजमेंट २४६९२ कोटी रुपये इतके आहे. त्यांच्या एकूण कर्जसंपत्तीत (टोटल लोन असेट) पैकी ३२ टक्के वाटा सोने तारण कर्जाचा आहे. बदललेल्या आर्थिक स्थितीचा परिणाम आयआयएफएलचा तिजोरीवर झाल्यामुळे फेअरफॅक्सने आयआयएफएएलला निधी दिला आहे. यावर आरबीआयच्या संपूर्ण कार्यवाही व संपूर्ण ऑडिट नंतर आयआयएफएल विषयी बँक आपला पुढील निर्णय जाहीर करणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121