मुंबई : बँकेत नोकरी करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या नवीन भरतीमुळे ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांना चांगलीच संधी मिळाली आहे. 'द हिमाचल प्रदेश स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' अंतर्गत काम करण्याची करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. 'द हिमाचल प्रदेश स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीकरिता दि. ०६ मार्च २०२४ पासून अर्जस्वीकृतीस सुरूवात झाली आहे. 'द हिमाचल प्रदेश स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' पदभरतीसंदर्भात अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता इ. आवश्यक निकषांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
हे वाचलंत का? >>> बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ३ हजार जागांकरिता आजच अर्ज करा, 'या' उमेदवारांना
प्राधान्य!
पदाचे नाव -
कनिष्ठ लिपिक (२३२ जागा)
सदर भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ मार्च २०२४ असेल.