अभिनेता शाहरुख खान याने कुटुंबींयांसमवेत जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्याने जय श्री रामच्या घोषणा देखील दिल्या होत्या.
मुंबई : सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (
Anant Ambani Radhika Merchant) यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाआधीचे महत्वपुर्ण विधी अर्थात प्री-वेडिंग कार्यक्रम नुकतेच १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये संपन्न झाले.यावेळी संपुर्ण चंदेरी दुनियेतील कलाकार जामनगरमध्ये अवतरले होते. अगदी अमिताभ बच्चन पासून ते सलमान खान पर्यंत सर्वच दिग्गज कलाकार मंडळींनी आवर्जून या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांचा आनंद द्विगुणित केला होता. यावेळी चक्क अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘जय श्री राम’चा (Jai Shree ram) नारा लगावला होता.
संपुर्ण अंबानी कुटुंबीय किती धार्मिक आहेत हे आपण सगळेजण जाणतो. जामनगरमध्ये देखील अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात धार्मिक वातावरण अनुभवण्यास मिळाले. यावेळी अनंत अंबानी यांनी म्हटले होते की, सगळ्यांना माहित आहेच की आम्ही सर्व कुटुंबीय रामभक्त आहोत. आणि प्रभू श्री राम यांच्या कृपेमुळेच आमच्या कुटुंबात सर्वकाही मंगल आहे. जय श्री राम”. अनंत अंबानी यांनी जय श्री रामचा जयघोष केल्यानंतर लगेचच शाहरुख खान याने देखील ‘जय श्री राम’चा जयजयकार केला.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये थिरकले दीपिका-रणवीर
हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांचे आवडते कपल दीपिका पडूकोण आणि रणवीर सिंग यांनी काही दिवसांपुर्वीच ते आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर ते दोघेही राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये उपस्थित होते. यावेळी झालेल्या संगीत कार्यक्रमात दीपिका आणि रणवीर 'गल्लां गूडिया' गाण्यावर थिरकताना दिसले. प्रेग्नंट असूनही दीपिकाने केलेल्या नृत्यामुळे तिने उपस्थित पाहूणे मंडळींची मने जिंकली.